शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दर ३० तासांत शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: September 24, 2016 01:13 IST

सलगचा दुष्काळ, नापिकी व कर्ज यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी मृत्युला कवटाळत आहे. यंदा १५

धक्कादायक : २५७ दिवसांत २४३ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूलागजानन मोहोड ल्ल अमरावती सलगचा दुष्काळ, नापिकी व कर्ज यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी मृत्युला कवटाळत आहे. यंदा १५ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच २५७ दिवसांत २४३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात दर तीस तासांत होणाऱ्या शेतकरी आत्महत्येचे चित्र धक्कादायक आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून शासनस्तरावर घेण्यात येत आहे. तेव्हापासून १५ सप्टेंबरपर्यंत २ हजार ९४६ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार १७१ प्रकरणे पात्र ठरली व १ हजार ७३१ प्रकरणे अपात्र आहेत. तर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यातील ४४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यापूर्वी २००९ मध्ये २२० शेतकऱ्यांनी मृत्युचा फास आवळला होता. सन २०१० मध्ये २८३, सन २०११ मध्ये २५४, सन २०१२ मध्ये १९१, सन २०१३ मध्ये १६८, सन २०१४ मध्ये २०९, सन २०१५ मध्ये ३०६ व यंदा १५ सप्टेंबरपर्यंत २४३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आतापर्यंत १ हजार १७१ शेतकऱ्यांची आत्महत्याप्रकरणे पात्र ठरली आहेत. १ हजार ७३१ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. त्यातही सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. सलग तीन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे मानसिक तणावात असणारा शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक चित्र जिल्ह्यात आहे. जानेवारी, आॅगस्ट महिन्यात दर २० तासांत आत्महत्या ४यंदाच्या जानेवारी महिन्यात ३९ व आॅगस्ट महिन्यात ३४ शेतकरीआत्महत्या झाल्या आहेत. दर वीस तासांत एका शेतकऱ्याने मृत्युचा फास आवळला आहे. मागील १५ वर्षांत सर्वाधिक ३०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यापूर्वीचा खरीप व रबी हंगाम उद्ध्वस्त झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी मरणाचा पर्याय स्वीकारत आहे. १५ वर्षांत २,९४६ शेतकरी आत्महत्या ४जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून २ हजार ९४६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २८५ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २२५, फेब्रुवारी २३६, मार्च २२०, एप्रिल १९०, मे २४३, जून २१३, जुलै २१५, सप्टेंबर २६३, आॅक्टोबर २३२, नोव्हेंबर २३६ व डिसेंबर महिन्यात २३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.