हा रोड कायमस्वरूपी होण्याकरिता अनेक वेळा गावातील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले . या आधीचे आमदार यांनासुद्धा हा रोड करण्याकरिता शेतकऱ्यांनी मागणी घातली होती. त्यांनीसुद्धा हा रोड करून देण्याचे आश्वासन दिले होते आणि शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले ह्या रोडवर अनेक रपटे असल्याने पावसाळ्यात शेतीची मशागत करिता आणि शेतामध्ये आलेले पीक घरी आणण्याकरिता फार मोठी कसरत करावी लागते ह्या रोड करिता अनेक वेळा शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून छोटे-मोठे रपटे टाकून रोड व्यवस्थित केला होता. परंतु जोरदार पावसामुळे ह्या रोडवरील छोटे-मोठे रपटे पाण्याने वाहून गेले. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पेरणीसुद्धा थांबली आहे . काही शेतकऱ्यांच्या समोर पेरणी कशी करावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या गांभीर्याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .
रपटा वाहून गेल्याने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST