शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-यवतमाळ मार्गावर शेतकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:15 IST

गेल्या काही दिवसांपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले व तुरीला भाव मिळत नसल्यामुळे सोमवारी शेकडो शेतकरी रस्त्यावर आले ...

नाफेडची खरेदी बंद : व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडलेनांदगाव खंडेश्वर : गेल्या काही दिवसांपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले व तुरीला भाव मिळत नसल्यामुळे सोमवारी शेकडो शेतकरी रस्त्यावर आले व त्यांनी अमरावती यवतमाळ मार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तुरीला ५०५० हमीभाव असताना नाफेडने गोडाऊनमध्ये तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याची सबब दर्शवून खरेदी बंद केली. त्याचा विपरित परिणाम होऊन व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दरारत तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले व त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अमरावती-यवतमाळ मार्गावर चक्काजाम करून वाहतूक काही काळ ठप्प केली, घोषणा दिल्या. ही बाब तहसीलदार बी.व्ही. वाहूरवाघ यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वेअर हाऊसचे अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक तसेच नाफेडचे अधिकारी यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला. अधिकाऱ्याला गोडाऊन भाड्याने घेण्यास सुचविले. सोमवारी बाजारात विक्रीस आलेल्या तुरीच्या मालाचा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे नाफेडची खरेदी बंद व दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे हा माल पडून होता. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार सहायक निबंधक पालटकर यांनी व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी हा माल ३८०० व ४२०० रुपयांनी खरेदी करण्याची सहमती दर्शविली. यावेळी शेतकऱ्यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. (प्रतिनिधी)