शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे ‘शोले’

By admin | Updated: May 31, 2017 00:25 IST

तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना एक वर्षापासून मंजूर झालेले अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने...

प्रहारचे नेतृत्व : पोलिसांचा तगडा बंदोबस्तलोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना एक वर्षापासून मंजूर झालेले अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी प्रहारचे विजय पाचारे यांच्या नेतृत्वात हिवरखेड येथील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी पद्धतीने आंदोलन केले. गारपीटग्रस्तांना मंजूर झालेले अनुदान तत्काळ देण्यात यावे, उष्ण तापमानामुळे संत्रा, आंबिया फळांची गळती होऊन अतोनात नुकसान झाले. अश्या शेतकऱ्यांना शासनाने सर्व्हे करून हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान जाहीर करावे. खरीप हंगामासाठी सरसकट शेतकऱ्यांना १५ दिवसाच्या आता बिनाअट कर्जपुरवठा करण्यात यावा. हे अभिनव आंदोलन सकाळी ९ वाजतापासून सुरू करण्यात आले. दरम्यान संतप्त आंदोलकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाही, तोपर्यंत शेतकरी पाण्याचे टाकीवरून खाली उतरणार नाही. जर जिल्हाधिकारी यांनी हिवरखेड येथे येऊन शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या निकाली काढतील तरच टाकीवरून खाली उतरू किंवा आत्मदहन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. आंदोलन चिघळत असल्याचे पाहून मोर्शीचे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी, ठाणेदार नंदकिशोर शर्मा हे आपल्या अधिनस्त पोलीस ताफ्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहून तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या रास्त असून त्या मी शासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करतो, असे लेखी आश्वासन देऊन १५ दिवसांच्या आत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात येईल, असेसुद्धा लेखी आश्वासन दिल्याने शेवटी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.