शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कृषिकेंद्रांचे नूतनीकरण आॅफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:48 IST

जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्राचे रखडलेले परवाने आॅफलाइन देण्यात येणार आहेत. कृषिसेवा केंद्र संचालकांच्या दहा मागण्यांबाबत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्यासमक्ष चर्चा करताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन : नगराध्यक्षांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्राचे रखडलेले परवाने आॅफलाइन देण्यात येणार आहेत. कृषिसेवा केंद्र संचालकांच्या दहा मागण्यांबाबत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्यासमक्ष चर्चा करताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे.कृषिसेवा केंद्राच्या समस्या निकाली निघाव्यात म्हणून धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी बुधवारी जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची भेट घेतली. कृषिसेवा केंद्रांचे परवाना नूतनीकरणाचे काम संगणकीकरणाचे संकेत स्थळ बंद असल्यामुळे दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या हंगामात बियाणे व खताची विक्री कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांसाठी आॅफलाइन सेवा गृहित धरण्यात येणार असून, त्यांना नूतनीकरणाचे परवाने देण्यात येणार असल्याचे खर्चान यांनी स्पष्ट केले.कृषिसेवा संचालकांसाठी कृषी कोर्स बंधनकारक करण्यात आले. ज्येष्ठ कृषिसेवा केंद्र संचालकांना त्यातून वगळावे, अशी विनंती करण्यात आली. गोडाऊनच्या परवानगीसाठी अडचणी दूर करण्याचे आश्वासन अधिकाºयांनी शिष्टमंडळाला दिले. कृषिसेवा केंद्रातून पीजीआरची विक्री करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी प्रताप अडसड यांना सांगितले.कृषिसेवा केंद्राच्या संचालकांच्या वारसांना परवाना तसेच अवैध खत, बियाणे विक्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी करण्यात आली. पुरविण्यात आलेल्या पॉस मशीन नादुरुस्त झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक स्तरावर ही अडचण दूर करणार असल्याची माहिती खर्चान यांनी दिली. यावेळी आत्माचे प्रदेश सदस्य नितीन मेंडुले, कृषी साहित्य विक्रेता संघाचे राजेश अग्रवाल, वीरेंद्र शर्मा, तालुक्यातील कृषिकेंद्र संचालक, सुजित मुंधडा, गणेश राजनकर, दिनेश वैरागडे, चांदूर रेल्वे येथील कृषिकेंद्र संचालक बाळू टावरी, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषिकेंद्र संचालक तथा तालुका पदाधिकारी प्रवीण खांदेल यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र