शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 21:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शासनाने मूग, सोयाबीन व उडदाची आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे जाहीर केल्याने स्थानिक शेतकरी येथे खरेदी-विक्री संघामार्फत नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली. सोमवारी नोंदणी होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच शेतकºयांनी रांग लावल्याने गर्दी झाली. त्यामुळे नोंदणीस्थळी एकच गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान शेतकऱ्यांची बाचाबाजी ...

ठळक मुद्देमनुष्यबळाचा अभाव : एकाचवेळी कागदपत्र पडताळणीमुळे गोंधळ, रात्र जागावी लागली

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शासनाने मूग, सोयाबीन व उडदाची आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे जाहीर केल्याने स्थानिक शेतकरी येथे खरेदी-विक्री संघामार्फत नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली. सोमवारी नोंदणी होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच शेतकºयांनी रांग लावल्याने गर्दी झाली. त्यामुळे नोंदणीस्थळी एकच गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. दरम्यान शेतकऱ्यांची बाचाबाजी झाल्याची माहिती आहे.नाफेडचे आॅनलाईन सेंटर उघडण्यात आले आहे. येथे चार टेबलवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून कागदपत्र घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र, आपला प्रथम क्रमांक लागला पाहिजे या ईर्ष्येने दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांनी एकाचवेळी केंद्रावर धाव घेतली. सर्वांना रांगेत राहण्यास सांगण्यात आले. पण, काही शेतकºयांनी आपला नंबर आधी लागावा यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत होते. नाफेडची आॅनलाईन नोंदणी बंद तर होणार नाही ना, त्या कारणाने आपला नंबर आधी लागावा, असे प्रत्येकांना वाटत होते. त्यामुळे केंद्रावर सर्वांनी एकाचवेळी धाव घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. शेतकऱ्यांना रांगेत उभे राहूनच नोंदणी करा, अशी विनंती ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी केली. पण कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही शेतक?्यांची लोटपोट झाली. या ठिकाणी तातडीने एसडीओ आंबेकर तहसीलदार अमोल कुंभार दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांततेत नोंदणी करण्याचे आवाहन केले. या प्रक्रियेसाठी योग्य नियोजन नसल्यानेच ही स्थिती ओढवल्याची चर्चा ऐकायला मिळाली.सबएजंटचे नियोजन कोलमोडलेनाफेडची आॅनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली खरी मात्र नाफेडच्या अधिकाऱ्यांकडे कुठलेच नियोजन नव्हते. एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी धाव घेतल्याने कागदपत्र तपासणी रजिस्टरमध्ये नोंद करताना मनुष्यबळाचा अभाव जाणवला. मंगळवारच्या रात्री सुध्दा शेतकऱ्यांनी शेतकरी सदनच्या आवारात ठिय्या मांडला त्यांनी नोंदणीसाठी रात्र जागुन काढली.मंगळवारी पोलीस बंदोबस्तात नोंदणीमंगळवारी सकाळी ७ वाजता पासून नाफेडची आॅनलाईन नोंदणी शांततेत पार पडावी यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. एसडीओ आंबकेर, तहसीलदार अमोल कुंभार, उपाविभागीय पोलीस अधिकारी सुनील काळे, ठाणेदार मुकुंद ठाकरे आदींची या ठिकाणी उपस्थिती होते. कुठलाही गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नाफेडच्या नोंदणीसाठी एवढे शेतकरी येतील याचा अंदाज नव्हता. त्यामुळे एकदम गोंधळाची स्थिती उदभवली. परंतु आता ती सुरळीत झाली आहे. मंगळवारी १ हजार शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे.- राजेंद्र गावंडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ दर्यापूर