शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

करजगावच्या तलाठ्याला शेतकऱ्यांनी बदडले

By admin | Updated: July 12, 2014 23:26 IST

तालुक्यात गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये वरिष्ठांकडे तलाठ्यांच्या तक्रारी

वरूड : तालुक्यात गारपीटग्रस्तांच्या अनुदान यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये वरिष्ठांकडे तलाठ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तलाठ्यांना घेराव घातला. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान करजगावच्या शेतकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी जगदीश वानखडे, विजय दापुरकर, सतीश लांडगे, गजानन बहुरुपी, राहुल बहुरुपी, सचिन बहातकर, गौरव बहुरुपी, सुनील कुरवाळे सर्व रा. करजगाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१३ च्या जनू ते सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. जानेवारी २०१४ पासून फेब्रुवारी, मार्चपर्यंत गारपिटीच्या तडाख्याने संत्रा, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. विमा योजनाही फसवी निघाली. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली. यामध्ये लोकसभा निवडणूक आणि मार्च अखेरच्या घाईगर्दीत वाटेल तशा याद्या तयार केल्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला. खचलेल्या विहिरींच्या अनुदानाकरिता पंचनामे करताना तलाठ्यांनी लाच घेतली. यामुळे ेशेतकऱ्यांचा असंतोष वाढतच गेला. परिणामी तालुक्यातील अनेक गावांत कुठे तलाठ्याला घेराव तर कुठे ओढाताण करण्याचे प्रकार घडले.शुक्रवारी करजगावच्या तलाठ्याला शेकडो शेतकऱ्यांनी घेराव घालून मारहाण केल्याची घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली. करजगाव (गांधी घर) येथे गारपीटग्रस्तांच्या कमी-अधिक अनुदानाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची काही नावे यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. खचलेल्या विहिरींच्या अनुदानाकरिता पंचनामे करताना शेतकऱ्यांकडून रक्कम उकळण्याचा गोरखधंदा करणाऱ्या तलाठ्याबद्दल रोष अनावर झाल्याने शेतकऱ्यांनी चोप दिल्याची माहिती आहे. महसूल अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. शेतकऱ्यांवर निसर्गाने केलेला अन्याय आणि प्रशासनाकडून त्यांची होेणारी हेळसांड लक्षात घेता शेतकऱ्यांची स्थिती किती विदारक आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच शेतकऱ्यांचा असंतोष आता उफाळून येऊ लागला आहे. (तालुका प्रतिनिधी)