शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

खरिपासाठी शेतकऱ्यांना हवा शासनाचा आधार

By admin | Updated: May 12, 2015 00:09 IST

सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. परिणामी ते पीक कर्जाची परतफेड करु शकले ...

अपेक्षा : विविध उपाययोजनांसह बी-बियाणे, खते, कर्जपुरवठा कराअमरावती : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. परिणामी ते पीक कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. यंदाही सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे बँका नातेवाईक मित्र आणि सावकारही पिकाच्या भरवशावर शेतकऱ्यांना कर्ज व आर्थिक मदतीसाठी तयार नाहीत. अशा बिकट परिस्थितीत शासनानेच शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत. विनाअट बँकांना पीककर्ज देण्याचे आदेश जारी करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आर्थिक परिस्थिती पूर्णत: ढासळली आहे. कर्जाचा डोंगर वाढला आहे. २०१२ मध्ये घेतलेले पीककर्ज फेडता आले नाही. २०१५ मध्ये गारपीट व अवकाळी पाऊस पडला. २०१४ मध्ये सरासरी ३० ते ४८ टक्के पर्जन्यमान कमी झाले. यावर्षी सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. पंचायत समिती वग्रामपंचायत घेणार ठरावसध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अंजनगाव पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हिरापूर येथे येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व विनाअट कर्जपुरवठा आणि आवश्यक उपाययोजना शासनाने करावा याबाबत ठराव घेऊन तो शासनाला पाठविला जाणार आहे. (प्रतिनिधी)शासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षासंपूर्ण पीककर्ज व वीज बिल माफ करावे, शेतीला नियमित वीज दिली जावी. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करुन द्यावे, पीक पद्धतीत बदल्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी, कमीत कमी पाण्यात येणारे व अधिक उत्पादन देणारे वाण शेतकऱ्यांना दिले जावे, शेडनेट पॉलीहाऊस सिंचनाचा वापर वाढण्याचे टार्गेट कृषी विभागाला दिले जावे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी. महागाई निर्देशांकानुसार शेतकरी कुटुंबाला मदत मिळावी, ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी द्याव्यात, नदी-नाले, डोंगर पोखरण्यास निर्बंध घालावे. कृषी विभागात कृषी शास्त्रज्ञ कर्मचाऱ्यांची बांधावर जाऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. कोरडवाहू शेतीसाठी विशेष धोरण राबवावे, लोकसहभागातून सर्वस्तरावर जलपुनर्भरणाची कामे सुरू करावीत.