शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By admin | Updated: February 18, 2017 00:11 IST

शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे.

किरण गित्ते : प्रशिक्षणासाठी ३०० ट्रॅक्टर चालकांची नोंदणीअमरावती : शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे. मात्र खारपाणपट्ट्यात जमिनीचा पोत नरम असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.जलयुक्त शिवार योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकासअंतर्गत प्रभा मंगलम् कार्यालय, अंजनगाव येथे आयोजित ट्रॅक्टरचालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे, सहायक संचालक कौशल्यविकास अशोक पाईकराव, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते.जिल्ह्यात सद्यस्थीतीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात. स्थानिकांना त्याप्रमाणे कौशल्य प्राप्त नसते. स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅक्टर चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंजनगाव दयार्पूर व भातकुली या तालुक्यामध्ये खारपाणपट्टा आहे. २२ गावातील खारपाणपट्ट्यातील गावांना शेततळ्याची गरज आहे. जिल्ह्यात ४५०० शेततळ्याचे उद्दिष्ट्य असून त्यापैकी २५०० हे अंजनगाव दर्यापूर तालुक्यात करायचे आहेत. वैज्ञानिक पद्धतीने शेततळे केले तर जास्तीत जास्त अर्धा एकरपर्यंत शेत जाऊ शकते. मात्र त्यातून उर्वरित शेताला संरक्षित सिंचन देऊन पिकाची उत्पादकता वाढवता येते. रामागड व नरदोडा या गावांमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून हरभऱ्याच्या पिकात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात ५०६ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली असून येत्या एप्रिल मध्ये २५० गावे आणखी जलयुक्त शिवारमध्ये घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात २५० विहिरी धडक सिंचन मोहिमेत घेण्यात आल्यात. मार्च २०१६ अखेरपर्यंत वीजजोडणीसाठी जवळपास १७०० शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिला डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा दोन शेतकऱ्यांना देण्यात आला. शेततळ्याची निर्मिती करून वाढीव उत्पन्न घेणाऱ्या विलास टाले नरदोडा व विजय लांजूळकर या दोन शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. आशुतोष गोळे या शेतकऱ्याला ट्रॅक्टरची चावी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली. शेततळे तयार करण्याचे उद्दिष्टे असल्याने त्यासाठी ट्रॅक्टरसह कुशल मनुष्यबळ तयार करणे, हेसुद्धा आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित ट्रॅक्टरचालक तयार झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या कौशल्य विकास कार्यक्रमात ३०० ट्रॅक्टरचालकांची नोंदणी झाली आहे.