अमरावती : शेतकऱ्यांजवळ कापूस शिल्लक नाही. अशा परिस्थितीत कापसाचा भाव यावर्षी प्रथमच ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे वधारला आहे. शेतकऱ्यांजवळील सोयाबीनदेखील संपला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे सोयाबीन हे २२०० ते २८०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. आता मात्र ३८०० ते ३९०० रूपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहे. शेतीचा सर्व हंगाम संपल्यानंतर व शेतकऱ्यांनी जवळचा शेतमाल विकल्यानंतर या महिन्यामध्ये सोयाबीन, तूर, हरभरा या शेतमालाच्या भावात ३०० ते ५०० रूपयांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा माल संपल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांनाच अधिक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.ही आहेत भाववाढीची कारणेरूपये १२०० ते १४०० रूपये दरात असणारी सरकी मागणी वाढल्याने २००० रूपये क्विंटलवर पोहचली आहे. त्यामुळे कापसाचे दर झपाट्याने वाढले आहे.कापूस गाठीचे भाव ३१ हजारावरून ३२ हजार ५०० रूपयावर पोहचले आहे. यामध्ये एक ते दीड हजाराची वाढ झाली आहे. सीसीआयच्या अहवालानुसार ४०० ते ५०० लाख गाठीचा अंदाज होता. मात्र तो १००० गाठीवर गेला आहे. वर्ष २०१४-१५ ची स्थितीयावर्षीच्या २०१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३९५० ते ४०५० रूपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला. भारतीय कपास निगम (सीसीआय) कडून साधारणपणे १५ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली व महिन्याभऱ्यापासून सीसीआय व पणन महासंघाची कापूस खरेदी बंद आहे.
शेतकऱ्यांजवळ कापूस नाही
By admin | Updated: April 19, 2015 00:24 IST