शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

कांद्याचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हताश !

By admin | Updated: May 18, 2016 00:18 IST

शेततळयात पाण्याचा ठणठणाट, विहिरींची खोल गेलेली पातळी, तालुक्यातून वाहणाऱ्या सापन, बिच्छन आणि पिली या कोरडया पडलेल्या नद्या,

शेतकरी खचला : सोशल मीडियावर चर्चाअचलपूर : शेततळयात पाण्याचा ठणठणाट, विहिरींची खोल गेलेली पातळी, तालुक्यातून वाहणाऱ्या सापन, बिच्छन आणि पिली या कोरडया पडलेल्या नद्या, भारनियमनाचा अडसर, पिकांवर आलेला अज्ञात रोग या सर्वांशी दोन हात करीत हाती आलेल्या कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांच्या डोळयात पाणी आले आहे.अचलपूर तालुक्यात ५४ हजार १११ हेक्टर जमीन शेतीयोग्य असून १ हजार १७६ हेक्टरमध्ये यावर्षी मोठया आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली होती. कांद्याचे उत्पादन चांगले व्हावे, नापिकीची तूट थोडयाफार प्रमाणात भरुन निघावी म्हणून अस्मानी आणि सुल्तानी संकटावर मात करुन शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. पीक घरात आले. कांदा साठविण्याची सर्वत्र लगबग सुरु आहे. मात्र, कांद्याचे दर कोसळलेले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्याला प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपये भाव सद्यस्थितीत दिला जात आहे.मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने सर्वच पिकांना तोटा सहन करावा लागल्याने आर्थिक व मानसिक खीळ बसलेल्या शेतकऱ्यांना थोडा आधार देण्यासाठी शेतकऱ्यांची मुले सरसावल्याचे सोशल मीडियावरून फिरणाऱ्या संदेशावरुन दिसत आहे. कांदा खाणारे ग्राहक व राजकीय नेत्यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या अनास्थेबाबतची, भावनिक आणि विनोदी मजकुराची चर्चा सोशल मिडियावर रंगत आहे. शेतकऱ्यांची भावना व मेहनतीची कदर करणारे संदेश पाठविण्याची चढाओढ सध्या दिसून येत आहे. कधी सरकारच्या तर कधी ग्राहकांच्या डोळयात पाणी आणणाऱ्या कांद्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या बळी राजाच्या डोळ्यात पाणी आणले.खरीप हंगाम खराब हवामानामुळे वाया गेला तर रबीत बदलत्या हवामानाबरोबरच बाजारात कांद्याला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही निघत नसून शेतकरी आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडला आहे.