शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांपासून पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांचा डेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:56 IST

शेतातील उभे पीक नष्ट करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जीवघेण्या त्रासापासून संरक्षण करा, या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी डेरा आंदोलन केले. येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक देत वन्यप्राण्यांच्या हैदोसाचे वास्तव या शेतकऱ्यांनी मांडले.

ठळक मुद्देउपवनसंरक्षक कार्यालयावर आंदोलन : १०० टक्के भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतातील उभे पीक नष्ट करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जीवघेण्या त्रासापासून संरक्षण करा, या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी डेरा आंदोलन केले. येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक देत वन्यप्राण्यांच्या हैदोसाचे वास्तव या शेतकऱ्यांनी मांडले.पीक संरक्षण समितीच्यावतीने नेरपिंगळाई भागातील वन्यप्राणिग्रस्त शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक कार्यालयावर केलेल्या डेरा आंदोलनामुळे वनविभागासह पोलिसांची तारांबळ उडाली. जिल्हा कचेरीकडे जाणारा मार्ग एका बाजूनेच सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना उशिरा सायंकाळपर्यंत या मार्गानेच ये-जा करावी लागली.दरम्यान, डेरा आंदोलनाद्वारे वन्यप्राण्यांपासून त्रस्त शेतकऱ्यांनी आपबिती कथन केली. वनक्षेत्राला तारेचे कुंपण करावे, अन्यथा शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर संरक्षण कुंपण द्यावे. वन्यप्राण्यांकडून नुकसानाचा समावेश पीक विम्यामध्ये करण्यात यावा. हरीण, रानडुक्कर, रोही आदी पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा वनसीमेतच बंदोबस्त करण्यात यावा. नुकसानाची १०० टक्के रक्कम देण्यात यावी. संत्रा कलमांना प्रतिलाख अडीच लाख, तर सोयाबीन, तूर, कपाशी पिकांकरिता प्रतिहेक्टर ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी. नुकसानभरपाई दाव्यातील अट रद्द करावी. नुकसानभरपाईची रक्कम १० दिवसांत अदा करावी, अशा विविध मागण्या यावेळी शेतकºयांनी मांडल्या.डेरा आंदोलन संजय मोहोकार, महेबुब दौला, साजीद पठाण, राहुल मंगळे, अरुण देशमुख, अफसर पठाण, नीलगश मंगळे, नीलेश मेहरे, उद्ववराव गणोरकर यांच्यासह नेरपिंगळाई व परिसरातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.या गावांतील शेतकरी आंदोलनात सहभागीडेरा आंदोलनात नेरपिंगळाईसह आखदवाडा, लिहिदा, पिंपळखुटा, पार्डी, भांबोरा, राजूरवाडी, कमळापूर, शिळरस, धानोरा, सार्सी, जामडोल, नांदोरा, गोराळा, सावरखेड, लेहेगाव, काटपूर, वाघोली, शिरखेड येथील त्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.