शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी आता ‘आधार’

By admin | Updated: April 17, 2017 00:13 IST

खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे.

१ जूनपासून अंमलबजावणी : जिल्हा कृषी विभागाचे नियोजन अमरावती : खरीप हंगामात शेतीसाठी आवश्यक बी- बियाणे, खतांची मागणी लक्षात घेता कृषी विभागाने सुक्ष्म नियोजन चालविले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ‘आधार’वर खते देण्याची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून राबविली जाणार आहे.जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी खत विक्रेत्यांची यादी तयार केली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांना खत खरेदी करताना गोंधळ उडू नये, यासाठी ‘पॉस’ मशीन देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्याांना खत खरेदीला जाताना आधारकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. खत खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना ‘पॉस’ मशीनमध्ये आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक ‘पॉस’ मशीनमध्ये टाकताच संंबंधित शेतकऱ्यांच्या आधारची माहिती मशीनवर झळकेल. ‘पॉस’ मशीनवर शेतकऱ्यांची ‘आधार’ माहिती दिसल्यानंतर सदर शेतकऱ्याला हाताच्या अंगठयाचे ठसे द्यावे लागेल. त्यानंतर खताचे पैसे दिल्यानंतर खत खरेदीचे बिल तयार होऊन शेतकऱ्यांना मिळेल. ‘पॉस’ मशीनसाठी इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे. इंटरनेटचा खर्च खत कंपन्यांकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अनुदानित रक्कमेवर दिले जाते. मात्र ‘आधारकार्ड’ द्वारे दिले जाणारे खत हे अनुदानित रक्कमेवर दिले जात आहे अथवा नाही? ही बाब प्रशासनाने अद्यापही स्पष्ट केली नाही. सवलतीची रक्कम सरकार खत कंपनीला अदा करायचे. मात्र कंपनीला अनुदान देताना सरकारकडे शेतकऱ्यांनी खत खरेदी केले की नाही? याची माहिती नसते. परंतु आता शेतकऱ्यांंना ‘आधार’ अनिवार्य केल्यामुळे किती शेतकऱ्यांनी सवलतीत खत खरेदी केले, हे शासनाला कळणार आहे. खत निर्मिती कंपनी जिल्ह्याच्या ठोक विक्रेत्याला पुरवठा करते. त्यानंतर ठोक खत विक्रेते घाऊक विक्रेत्यांना खते पुरवितो. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी लागणार फलकयंदा खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना ‘आधार’ अनिवार्य करण्यात आले आहे. खत खरेदीत शेतकऱ्यांच्या नावे कंपन्यांकडून अनुदान उकळण्याचा होणारा गैरप्रकार बंद करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहे. शेतकऱ्यांना खते खरेदीसाठी ‘आधार’ बाबत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीचे फलक लावले जाणार आहे. त्याकरिता कृषी विभाग कामाला लागला आहे.शेतकऱ्यांना खत खरेदी करताना पॉस मशीनमध्ये आधारक्रमांक अनिवार्य आहे. त्यामुळे ही प्रणाली राबविताना खत विक्रेत्यांना अडचणी येवू नये, यासाठी जिल्हाभरात प्रशिक्षण दिले जात आहे. ११०५ मशीन पोहचल्या आहेत.- उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी, जि.प.