शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता अपघात विम्याचे संरक्षण कवच

By admin | Updated: April 17, 2016 00:03 IST

शेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, ....

कृषी खात्याची योजना : जिल्ह्यात पाच प्रस्ताव दाखलसचिन सुंदरकर अमरावतीशेतीव्यवसायात अनेक आपत्तीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो. किंवा काहींना अपंगत्व येते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास आर्थिक लाभ देण्यासाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सदर योजनेचे नामाभिधान आता 'गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना' असे करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच ठरली आहे. या योजनेंतर्गत सद्यस्थितीत पाच प्रस्ताव दाखल झाले आहेत.शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक स्वरुपात दोन लाख रुपये, एक अवयव अपंग झाल्यास एक लाख रुपये, दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये लाभ देण्याची तरतूद या विमा योजनेत आहे. विम्याचा कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ठेवण्यात आला आहे. अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी महसूल कागदपत्रे सात-बारा फेरफार नोंदणीकृत असणे आवश्यक असून वयोमर्यादा १० ते १५ वर्ष ठेवण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर लवकरात-लवकर सबंधीत कृषी पर्यवेक्षकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी कोणत्याही विधीज्ञ किंवा एजंट नेमण्याची गरज नाही. विमा संरक्षणासाठी रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश, प्राणिदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल अशा प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी म्हणून त्यांच्या नावाचा समावेश असलेल्या सातबाराचा उतारा, ६ (ड) ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे सातबारावर नाव असणे अनिवार्य आहे त्याचप्रमाणे ६ (क) शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारसांची झालेली नोंद वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे. स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र वारसाचे दावा पत्र, शवविच्छेदन अहवाल असल्यास 'व्हिसेरा रिपोर्ट', अपंगत्व असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र बँकेच्या पासबुकची प्रत असणे आवश्यक आहे. शेतकरी अपघात विमा योजनेचा विमा उतरविण्याची अधिकृत जबाबदारी पुण्याच्या नॅशनल इंन्शोरन्स कंपनीकडे असून विमा सल्लागार कंपनी म्हणून बजाज कॅपिटल इन्शोरन्स ब्रोकिंग लिमिटेड काम पाहत आहे. शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक (कृषी) यांनी केले आहे.