शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

शेतकरी पुन्हा सावकारी पाशात

By admin | Updated: November 15, 2015 00:11 IST

दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली.

संस्कृती जपण्याचा परिणाम : कर्जाचा डोंगर कायमसुमित हरकुट चांदूरबाजारदुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या जगाच्या पोशिंद्याला परंपरा जपण्याच्या नावाखाली दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाईलाजाने सावकारांच्या दारात जाण्याची पाळी आली. जीवनात आनंद कसा उपभोगायचा याचे खरे शिक्षण शेतकऱ्यांकडून घेता येईल. जिवनाचे खरे सत्य त्यांनाच उलगडले आहे. कारण सर्वपरिस्थितीत संस्कार आणि प्रथा या गोष्टीची खऱ्या अर्थाने जतन करणारी मानवजात म्हणजे शेतकरी होय. सुख व शांतीचे प्रतीक म्हणून दिवाळी या सणाची ओळख आहे. या दिवशी आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक जण आपल्या प्रतिष्ठानाची, घराची सफासफाई करून रंगरंगोटी करतात. चिमुकल्यांसाठी नवनवीन कपडे खरेदी करतात. सर्वीकडे रोषणाईचा झगमगाट केला जातो, तर सणासुदीनिमित्त घरात फराळ व गोड पदार्थ बनविल्याची पारंपरिक पद्धत आहे. परंतु या परंपरा जपण्याकरिता अखेर पैसा लागतो. सतत तीन वर्षांपासून होत असलेल्या नापिकीमुळे जगाचा पोशिंदा सावकाराच्या दारातमदतीसाठी भटकत आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतीतून उत्पादन खर्चसुद्धा निघालेला नाही. बँकेचे कर्ज काढून पेरलेले सोयाबीन पीक हातातून गेल्यामुळे दिवाळी साजरी करावी कशी, असा गहण प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव खासगी सावकारांच्या दारावर सण साजरा करण्याकरिता जाण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. संत्रा या पिकाचीसुद्धा हीच स्थिती निर्माण झाली असून संत्रा व्यापारी संत्रा बागेकडे फिरतसुद्धा नसल्यामुळे तालुक्यातील कित्येक संत्रा बागेत संत्रा तसाच पडून आहे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेल्या कापूस हे पीक दिवाळीनंतर येत असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खालावली आहे. असे असले तरी आपल्या संस्कृतीचे जतन करण्याकरिता बळीराजा सावकाराच्या दारी जाऊन पैशाची मागणी करीत असल्याचे चित्र आहे. सणासुदीत हा पोशिंदा पोटाला चिमटा घेऊन परिवाराच्या संसाराचा गाडा चालवित आहे. संस्कृतीचे जतन करीत आहे. मात्र प्रथा राबवीत असताना स्वत:च्या जीवनाचे वाटोळे करीत आहे. एकंदरीत शासनाकडून मिळणारे आश्वासनांपेक्षा शासनाकडून मिळणारी मदतच त्यास आवश्यक आहे. कारण पैशाचे काम अखेर पैसाच करतो, आश्वासन नाही.