शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

१५० दिवसांत ९४ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:57 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उदध््वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.

ठळक मुद्देधक्कादायक : दर ३० तासांत शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उदध््वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी-शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या पाच महिन्यात म्हणजेच १५० दिवसांत ९४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ३१ मे २०१८ पर्यंत ३ हजार ४१८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये १ हजार ४२३ प्रकरणे पात्र, १ हजार ९३४ अपात्र, तर ६१ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला मान्यता मिळाली नाही.शेतकरी मिशनची उपलब्धी काय?राज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाऱ्या १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.२००१ पासून ३ हजार ४१८ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३४१८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिन्यात २६७, फेब्रुवारी २९०, मार्च ३०५, एप्रिल २३९, एप्रिल २८६, मे २५७, जून २६२, जुलै २६२, आॅगस्ट ३२५, सप्टेंबर ३१५, आॅक्टोबर २८५, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिन्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यंदा जानेवारीत २३, फेब्रुवारीत २०, मार्च २६, एप्रिल १३ व मे महिन्यात ११ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या.