शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात रोहयो कामात बनावट मजूर, अंगठ्याने देयके काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:28 IST

मेळघाटातील धूळघाट रेल्वे येथील रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट मजूर आणि अंगठ्याने देयके काढण्यात आल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (रोहयो) कडे सादर केला आहे.

ठळक मुद्देत्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल : आरएफओ, वनरक्षकावर कारवाई होणार

आॅनलाईन लोकमतअमरावती : मेळघाटातील धूळघाट रेल्वे येथील रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट मजूर आणि अंगठ्याने देयके काढण्यात आल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (रोहयो) कडे सादर केला आहे. याप्रकरणी दोषी वनक्षेत्राधिकारी, वनरक्षकावर कठोर कारवाई होईल, असे संकेत आहेत.रोहयो उपायुक्तांकडे एस.के. तायडे यांनी २७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार धूळघाट रेल्वे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आणि वनरक्षक सविता बेठेकर यांनी रोहयोच्या कामात गैरप्रकार केल्याचे म्हटले होते. त्यानुसार रोहयो उपायुक्तांनी १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत झालेल्या कामांचे रेकॉर्ड तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित केली होती. यात रोहयोचे कार्यकारी अभियंता ए.एच. खान, लेखाधिकारी एस.एस. सुपासे, सहायक लेखाधिकारीे आर.जी. रायकवार यांचा समावेश होता. या समितीने २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान धारणी येथे मोका चौकशी केली. चौकशीदरम्यान २४ मुद्द्यांसंदर्भात कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. विशेषत: हजेरी पत्रकावर ग्रामरोजगार व वनरक्षकांची स्वाक्षरी न घेता आरएफओंनी हजेरी पत्रक स्वत:च्या स्वाक्षरीने १४ हजार ५७२ रुपये काढल्याचे समितीच्या निदर्शनास आले. आरएफओ, वनरक्षकांन स्वत:च्या स्वाक्षरीने मजुरांचे हजेरीपत्रक भरल्याची बाब समोर आली आहे. धारणी तालुक्यातील पळसाकुंडी येथे होळी सणाच्या काळात मजूर कामावर गेले नसताना बनावट स्वाक्षरीने देयके काढण्यात आली आहेत. हजेरीपत्रकावर बनावट मजूर दाखवून रोहयोची कामात छेद लावण्याचा प्रताप आरएफओ दीपाली चव्हाण, वनरक्षक सविता बेठेकर यांनी केल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. वनाधिकाºयांनी रोहयोची कामात बनवाट मजूर आणि खोट्या स्वाक्षरीने तहसीलदारांकडे हजेरीपत्रक प्रदान केली आहेत. त्रिसदस्यीय चौकशी समितीने विभागीय आयुक्त कार्यालयाचे रोहयो उपायुक्तांकडे ९ जानेवारी २०१८ रोजी वस्तुनिष्ठ अहवाल पुढील कारवाईकरिता सादर केला आहे. आता याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे वनविभागातील सर्वांचे लक्ष लागले आहे.७४ वर्षीय महिला दर्शविली मजूरहजेरीपत्रक क्रमांक १९०६२ नुसार जीजाबाई गायकवाड या ७४ वर्षाच्या आहेत. त्यांनी धारणी तहसीलदारांसमक्ष बयाण नोंदविले. आपण कोणत्याही कामावर गेले नाहीत. तरीसुद्धा रोहयो हजेरीपत्रकावर नाव नमूद आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांचे नावे बनावट देयके काढल्याचे ही बाब चौकशी समितीने समोर आणली आहे.अपघातात जखमी महिलेचीही काढली देयकेहजेरीपत्रक क्रमांक १९०६३ नुसार मीराबाई गावंडे यांचा एका अपघातात पायाला दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला. त्या अलीकडे काठीचा आधार घेऊन कसेबसे चालतात. रोहयोच्या मजूर नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे तहसीलदारांकडे लिहून दिले आहे. त्यांच्या नावे हजेरीपत्रक भरून पैसे काढल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे.