१० हेक्टर क्षेत्रात पाणी : गहू, हरभरा पीक पाण्याखाली धामणगाव रेल्वे : अप्पर वर्धाअंतर्गत असलेला तालुक्यातील मुख्य कालवा मलातपूर गावानजीक मध्यरात्री फुटल्याने १० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे़ अप्पर वर्धा प्रकल्पाचे रब्बी पीकासाठी मागील दोन दिवसांपासून पाणी सोडण्यात आले़ हे पाणी काल मध्यरात्री मुख्यकालव्या द्वारे तालुक्यात पोहचले मोर्शीपासून वाहत आलेला कचरा मलातपूर या भागातील पाईप मध्ये आला दरम्यान हा मुख्य कालवा प्रथम ओव्हर फ्लो झाला पाण्याची गती अधिक असल्याने हा कालवा फुटला. त्यामुळे सुधाकर कुऱ्हाडकर, नरेश शर्मा, रमेश इंगोले, जुगलकिशोर लक्ष्मीनारायण शर्मा, मनोज ढोबळे, अजय शर्मा, रमेश कार्लेकर, संजय शर्मा या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, तूर, हरभरा, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ या विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता सु़ना़ पंड हे रविवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून या भागातील झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानग्रस्त शेताची पाहणी केली़ तर मंडळ अधिकारी प्रकाश बमनोटे, तलाठी डी़ ड्ब्ल्यू गुल्हाने यांनी पंचनामा करायला सुरूवात केली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 01:13 IST