शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचे विधान बेजबाबदारपणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:01 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही. १२ आणि १३ नोव्हेंबरला अमरावतीत जे घडले तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता. आता याचे राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.अमरावती येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील जनतेने सरकारला मोठ्या प्रमाणावर मदत केली. राज्याला याप्रसंगी शांतता हवी आहे, हेच यातून दिसते. मी राज्याच्या जनतेचे आभार मानते, राज्याला शांतता हवी आहे आणि हे सरकार कुठल्याही प्रकारे शांतता भंग होऊ देणार नाही.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आहेत. मात्र, त्यांना मतांच्या राजकारणापोटी राज्याचे वातावरण बिघडवायचे आहे, असे दिसत आहे. या दोन्ही घटना तितक्याच दुर्देवी आणि निंदनीय आहेत. दोन्ही घटनांमध्ये सामील असलेल्यांवर कारवाई सुरू आहे. इतकेच नव्हे तर या घटनांचा वापर करून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचाही विशेष पथकामार्फत तपास सुरू आहे, असे ना. यशोमती ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.आज देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौरा करून तिथले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीने नेहमीच सर्वांचे स्वागत केले आहे. पण, अमरावतीत येऊन त्यांनी शांततेचे आवाहन केले असते तर बरे झाले असते. मात्र, त्यांनी या घटनेवरून राजकारणच करण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी १३ तारखेची घटना चुकीची आहे, हे मान्य केले. मात्र, याची जबाबदारी घेऊन एक शांत शहर अशांत केल्याप्रकरणी राज्याची माफीही त्यांनी मागितली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री ठाकूर यांनी केली. 

दोन्ही मोर्चांची योग्य दखल घेतली गेली. कोणालाच सोडणार नाही, ही सरकारची भूमिका आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस अर्धवट माहिती देत असल्याची टीका त्यांनी केली. रझा अकादमीचे राजकीय लागेबांधे कुणाशी आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. रझा अकादमीवर कायदेशीर कारवाईबाबत गृहविभाग कारवाई करत आहे. त्याबाबत राज्याचे गृहमंत्री लवकरच माहिती देतील, तसेच या घटनेची राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे ना. ठाकूर म्हणाल्या.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर