शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

‘चेनस्नॅचर्स’भोवती फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:46 IST

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाºया दोन आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी अवघ्या तासभरात जेरबंद केले.

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : उत्तमनगरातील घटना, तासाभरात छडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाºया दोन आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी अवघ्या तासभरात जेरबंद केले. उत्तमनगरात दुपारी १२ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मनीष बळीराम पाटील (१८), विक्की ऊर्फ महेश प्रभाकर राऊत (१८,दोन्ही रा.मायानगर) अशी आरोपींची नावे आहेत.उत्तमनगरातील रहिवासी आरती विनोद शेगोकार (४५) ही महिला पती व मुलीसोबत राहते. बुधवारी दुपारी १२ वाजता आरती घरासमोरील आवारात उभ्या असताना त्यांना दुचाकीवर दोन युवक रस्त्यावरून चकरा मारताना आढळून आले. मात्र, त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान आरती या घराच्या आवारात तोंड धुवत असताना ते दोन युवक त्यांच्या घरासमोरच थांबले. दुचाकीच्या साईड ग्लासमधून ते युवक आरती यांच्याकडे लक्ष ठेऊन होते. हा प्रकार आरती यांची मुलगी पूजा हिच्या लक्षात आला. तिने आईच्या लक्षात ही बाब आणून दिली. मात्र, तेवढ्यात आरोपी मनीष पाटील आरतीजवळ आला आणि त्याने त्यांच्या गळ्यावर हात मारून ६ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकाविले.आरोपीला घरातून अटकयावेळी आरती व आरोपी मनीष यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर मनीष त्याचा साथीदार विक्कीसोबत दुचाकीवरून पसार झाला. घटनेची माहिती आरती यांनी तत्काळ फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी, दुय्यम पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस शिपाई विनोद माहोरे, अमोल मनोहर, सतीश विधे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी चौकशी करून तासाभरात आरोपींना मायानगरातील त्यांच्या घरातून अटक केली. पोलिसांनी चोरी गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यासाठी आरोपींची कसून चौकशी सुुरू केली होती.महिलेचे धाडस कौतुकास्पदआरोपी गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न करीत असताना आरती शेगोकार यांनी मात्र धाडस दाखविले. त्यांची मनीष पाटीलसोबत झटापट सुरु असताना त्यांनी मनीषची कॉलर पकडून त्याच्या कंबरेत लाथ सुद्धा लगावली व त्याला खाली पाडले आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत मनीष याने आरतीच्या हाताला चावा घेतला आणि तो पसार झाला. आरती यांनी दाखविलेले हे धाडस कौतुकास्पद असून इतर महिलांनी देखील संकटांचा असाच धैर्याने सामना करायला हवा.सीसीटीव्हीत घटना कैदचेनस्नॅचिंगची माहिती महिलेकडून घेतल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलविली. पोलिसांनी उत्तमनगरातील रस्त्यावरील व्यापारी प्रतिष्ठानातील सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक एमएच २७ डीएम-९६७२ असल्याचे समजले. त्याआधारे आरोपींचे नाव निष्पन्न होताच दोघांना अवघ्या तासाभरात अटक केली.स्वस्तिकनगरात सोनसाखळी हिसकलीअमरावती : किराणा दुकानदाराच्या गळ्यातील १५ ग्रॅ्रमची सोनसाखळी हिसकावल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील स्वस्तिकनगरात घडली. प्रभाकर रामचंद्र पडोळे (७२,रा.स्वस्तिकनगर) यांचे घरासमोरच किराणा दुकान आहे. हेल्मेटधारक दुचाकीस्वाराने दुकानात येऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केले. तक्रारीच्या आधारे राजापेठ पोलिसांनी हेल्मेटधारक दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.