शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इवल्याशा विवानच्या डोळ्यांनी मिळेल दोन अंधांना दृष्टी !

By admin | Updated: August 26, 2016 00:12 IST

दोन वर्षीय चिमुरडा विवानचे छातीच्या आजाराने गुरूवारी सकाळी निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगातून सावरत हिरडे दांपत्याने त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला

अमरावती : दोन वर्षीय चिमुरडा विवानचे छातीच्या आजाराने गुरूवारी सकाळी निधन झाले. या दु:खाच्या प्रसंगातून सावरत हिरडे दांपत्याने त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला आणि सामाजिक बांधिलकी जपली. विवानच्या नेत्रदानामुळे दोन अंधांना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळाली. महेंद्र कॉलनीतील रहिवासी डॉ. मुरलीधर व शिक्षिका प्रिती हिरडे यांच्या निर्णयामुळे विवानच्या डोळ्यांनी दोन नेत्रहीन हे सुंदर जग पाहणार आहेत. काही अत्यंत दुर्लभ गोष्टी निसर्गाने मानवाला जन्मजात बहाल केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे दृष्टी. डोळ्यांशिवाय जगण्याची कल्पनाच करवत नाही. परंतु काही अभागी व्यक्ती विविध कारणांमुळे दृष्टीसुखापासून वंचित राहतात. त्यांचे जीवन अंध:कारमय होते. अशा व्यक्तींच्या जीवनात नेत्रदानाने प्रकाश येऊ शकतो. हिरडे दांपत्याने दु:ख बाजूला सारून विवानचे नेत्रदान केले. नेत्रशल्य चिकित्सक कुणाल वानखडे व समुपदेशक उद्धव जुकडे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी हिरडे दांपत्याला धीर देऊन त्यांच्या या समाजाभिमुखतेचे कौतुक केले. मरणोपरांत नेत्रदान : दु:ख बाजूला सारून हिरडे दाम्पत्याने जपले समाजभाननेत्रदान हे श्रेष्ठदान!मृत्युपश्चात स्वत:चे डोळे दान करणे म्हणजे नेत्रदान. यामुळे व्यक्ती मृत्युनंतरही दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो. मृत्युनंतरही जीवंत राहण्याची संधी यामुळे मिळते. दान केलेले बुब्बुळ (डोळे) नेत्रशल्यचिकित्सकांना मोफत पुरविण्यात येतात. एका व्यक्तीकडून प्राप्त दोन डोळे (कार्निया) दोन अंधांना लाऊन त्यांना दृष्टीलाभ देण्यात येतो. नेत्रदानासाठी आवश्यक बाबी मृत्युुनंतर मृत व्यक्तिचे डोळे त्वरित बंद करावेत. डोळ्यांवर ओले स्वच्छ कापड ठेवावे. डोक्याखाली उशी ठेवावी. मृत्युनंतर जवळच्या नेत्रपेढीस त्वरीत कळवावे. मृत्युनंतर चार ते सहा तासांच्या आता डोळे काढल्यास ते प्रत्यारोपणास उपयोगी पडू शकतात. नेत्रदान पंधरवड्याची सुरूवात विवानच्या नेत्रदानाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान नेत्रदान पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याची सुरुवात विवान या दोन वर्षीय बालकाच्या मरणोपरांत नेत्रदानाने झाली. हिरडे दाम्पत्यांने दु:खातून सावरत हे आगळे कार्य पार पाडले. हिरडे कुटुंबाने दु:खातून सावरत दोन वर्षीय मुलाचे नेत्रदान केले. यामुळे दोघांना दृष्टी मिळणार आहे. अत्यंत अभिनंदनीय निर्णय आहे. या महान कार्याने नेत्रदान पंधरवड्याला सुरुवात झाली आहे, याचा अभिमान आहे. - अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक