शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीच्या कला-वाणिज्य महाविद्यालयात कमालीचा अनुत्साह

By admin | Updated: June 3, 2014 02:13 IST

शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य या महत्त्वपूर्ण

संस्था

अमरावती

की आखाडा? : राजकीय महत्वाकांक्षेपुढे विद्यार्थ्यांचे कौतुक थिटे : शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य या महत्त्वपूर्ण महाविद्यालयात कला, वाणिज्य शाखेबाबत निकालाच्या दिवशी कमालिचा अनुत्साह दिसून आला. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी ऐन बारावीच्या निकालाच्या दिवशीच विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठेवल्यामुळे बहुतांश शिक्षकवंृद त्याच कामी व्यस्त होते.

शिक्षण

मंडळाने अलिकडे गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे जाहीर करणे बंद केले. प्रत्येक महाविद्यालय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करतात. सर्वच महाविद्यालयांची तयार झालेली अशी यादी पडताळून मग शहरातील, जिल्ह्य़ातील अव्वल मुलांची अंतिम यादी तयार केली जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या नात्यात निकालाचा दिवस महत्त्वाचा व संवेदनशील मानला जातो. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी कुणी किती गुण प्राप्त केले याचे औत्सुक्य शिक्षकांनाही कमालीचे असते. त्याच औत्सुक्यातून महाविद्यालयांमध्ये टक्केवारी तपासणीचेही कार्य होते. विद्यार्थ्यांचे पेढा भरवून कौतूक केले जाते; परंतु शिक्षणाचे महत्त्व घराघरात रूजविणार्‍या शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात आज निकालाच्या दिवशी असे काहीच घडले नाही. आमच्या कर्मचार्‍यांनी निकालाची टक्केवारी बघितली. १00 टक्के निकाल लागला इतकेच मला ठाऊक आहे. गुणवंतांची यादी आम्ही आज तयार केली नाही. निकालाबाबत मी काहीच बघितले नाही. इतर शिक्षकांनाही महाविद्यालयात आज ही यादी तयार करता आली नाही. उद्या आम्ही यादी तयार करू, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य स्मिता देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कधिकाळी

विद्यार्थ्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी झटणार्‍या शिवाजी शिक्षण संस्थेत आज राजकारणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांमुळे संस्थेला महत्त्व आले त्या विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक आयुष्यातला आनंद आज संस्थाध्यक्षांच्या राजकीय महत्वाकांक्षेपुढे म्हणूनच थिटा पडल्याचे कला-वाणिज्य महाविद्यालयातल निरस वातावरणावरून जाणवले.