अमरावती : नोव्हेल कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अतिसतर्कता बाळगण्याबाबतचे आदेश जारी केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील प्राचार्य, मुख्याध्यापकांना कोरोना विषाणूपासून काळजी, उपाययोजनांबाबतची मार्गदर्शिका बुधवार, ११ मार्च रोजी पाठविण्यात आली आहे.राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी कोरोना विषाणूपासून विद्यार्थी, शिक्षक वृंदांना सावधगिरी बाळगण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांवर जनजागृतीची जबाबदारी सोपविली आहे. प्रार्थनेच्यावेळी विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शनाबाबत गाईडलाईन देण्यात आल्या आहेत. हल्ली परीक्षेचा हंगाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात किंतु-परंतु येता कामा नये, यासाठी कोरोना जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत कळविले आहे. शाळेत पाणी स्थळावर घाण होऊ नये, असे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.अशी घ्यावी लागेल काळजीकोरोना विषाणूपासून सावधगिरी बाळगण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना वारंवार हात धुण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तसेच खोकलताना किंवा शिंकताना रूमाल हाताळावा लागणार आहे. शक्यतोवर विद्यार्थ्यांनी टिश्यू पेपरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवावे. सॅनिटायझर वापरणे योग्य राहील. आजारी व्यक्तिपासून दूर राहावे अथवा टाळावे, अशा मार्गदर्शक सूचनांचा समावेश परिपत्रकात करण्यात आला आहे.
शाळांना अतिसतर्कतेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST
विषाणूपासून काळजी, उपाययोजनांबाबतची मार्गदर्शिका बुधवार, ११ मार्च रोजी पाठविण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी कोरोना विषाणूपासून विद्यार्थी, शिक्षक वृंदांना सावधगिरी बाळगण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण होऊ नये, यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांवर जनजागृतीची जबाबदारी सोपविली आहे.
शाळांना अतिसतर्कतेचे आदेश
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षक, मुख्याध्यापकांवर