शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात पीएचडी प्रवेशासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:10 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, आता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एम.फील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडसर तसेच नवीन संशोधन केंद्रांची नावे जाहीर करावयाची असल्याने ही मुदतवाढ कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३० जानेवारी डेडलाईन : १०३ संशोधन केंद्रांवर प्रवेशाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएच.डी. प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, आता ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एम.फील. विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील अडसर तसेच नवीन संशोधन केंद्रांची नावे जाहीर करावयाची असल्याने ही मुदतवाढ कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये देण्यात आली आहे.विद्यापीठात पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत बरेच अडथळे येत आहेत. एम.फील. विद्यार्थ्या$ंच्या प्रवेशातील अडचणींमुळे दिवसेंदिवस या प्रक्रियेला उशीर होत चालला आहे. सिनेटमध्ये एम.फील. विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्याचे मान्य केल्याने ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येणारी प्रवेशाची मुदत वाढवून ३० जानेवारी २०१९ अशी करण्यात आली आहे.प्रवेश निश्चित करण्यासाठी १५ जानेवारीऐवजी १५ फेब्रुवारी अशी मुदत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वाढवून दिली आहे.एम.फील.बाबत निर्णय केव्हा?विद्यापीठात अगोदर एम.फील.ची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी कोर्स वर्कमधून सूट देण्यासंदर्भात अधिष्ठात्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. विद्यापीठाने प्रवेशाची मुदत वाढवली असली तरीही यावर लवकरात लवकर निर्णय होण्याच्या अपेक्षेत विद्यार्थी आहेत.१२१५ विद्यार्थी पॅट उत्तीर्णमार्च आणि सप्टेंबर महिन्यात पॅट परीक्षांचे निकाल लागले असून, त्यात अनुक्रमे ११५३ आणि ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याव्यतिरिक्त नेट-सेट आणि एमफील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनादेखील पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील १०३ केंद्रांवर हे प्रवेश दिले जाणार असून, जानेवारी महिन्यात आणखी काही संशोधन केंद्रे जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.