शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

एक्स्प्रेस हायवे पुन्हा गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

कोरोना संसर्गाची भीती बाळगून असणारे शेकडो लोक महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जात असल्याचे चित्र आहे. नुकतीच काहीशी शिथिलता मिळताच मुंबई, पुण्याकडचे मजूर खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी असणारे विद्यार्थी तसेच इतर अनेक कारणास्तव अडकलेले शेकडो लोक त्यांच्या राज्याकडे जाण्यास धडपडताना दिसत आहे. पायदळ जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

ठळक मुद्देघराची ओढ : पायदळ, मिळेल त्या वाहनांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेरा शहरापासून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर पुन्हा वाहनांची व पायदळ जाणाऱ्यांची गर्दी वाढली. मजुरांचे लोंढे आपल्या गावाकडे जाणाऱ्या मिळेल त्या वाहनांमध्ये जागा शोधताना दिसत आहेत.कोरोना संसर्गाची भीती बाळगून असणारे शेकडो लोक महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात जात असल्याचे चित्र आहे. नुकतीच काहीशी शिथिलता मिळताच मुंबई, पुण्याकडचे मजूर खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी असणारे विद्यार्थी तसेच इतर अनेक कारणास्तव अडकलेले शेकडो लोक त्यांच्या राज्याकडे जाण्यास धडपडताना दिसत आहे. पायदळ जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऑटोरिक्षा, सायकल्स, दुचाकी व खासगी तसेच ट्रकमध्ये मोठ्या संख्येत लोक गेल्या काही दिवसांपासून घराकडे जात असल्याचे चित्र आहे. १७ लोकांचे कुटुंब ज्यात महिला, लहान मुलांचा समावेश आहे, असे फलटणहून झारखंडकडे पायदळ जात आहे. त्यांनी बडनेरा शहरालगतच्या वाय पॉईंटवर विश्रांती घेतल्याची माहिती आहे. एक्सप्रेस हायवेवरून जाणाऱ्यांना वाय पॉईंट याठिकाणी सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवून दिले. रात्रंदिवस काही लोक याठिकाणी आळीपाळीने महामार्गावरून जाणाऱ्यांना सेवा देत आहेत. नाश्ता, जेवण, पाणी, विश्रांती तसेच प्राथमिक औषधोपचार दिले जात आहे. शेकडो लोकांना याचा लाभ मिळत आहे. या सत्कार्यात नितीन कदम, किशोर जाधव, राजू देवडा, नितेश गांग, शिवलाल बिसने, राहुल जाधव, योगेश संकलेचा, निलू काळे, उमेश पांडे, शिवा जाधव, पंकज कटारिया, महावीर देवडा यांच्यासह शहरातील अनेक लोक आपल्या क्षमतेनुसार सेवा देत आहेत. घरी जाण्याची ओढ असलेले परप्रांतीय मजूर, कामगार कुटुंबीयांना उपाशीपोटी दोन घास अन्न मिळत असल्याने ते धन्यवाद देत आहेत.ऑटोरिक्षांची संख्या मोठीमुंबईहून मोठ्या संख्येत ऑटोरिक्षा आपल्या कुटुंबांना घेवून घराच्या दिशेने जात आहे. उत्तरप्रदेश, बिहारकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ऑटोरिक्षा जवळपास दोन हजार किलोमिटरचा पल्ला गाठतो आहे. याचबरोबर पायदळ तसेच सायकलस्वार देखिल मोठा पल्ला गाठत असल्याचे चित्र महामार्गावर पहावयास मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या