शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा

By प्रदीप भाकरे | Updated: March 7, 2024 17:46 IST

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला.

अमरावती : सोयरिक निश्चित करून आता आपण लग्न करणारच आहोत, अशी बतावणी करत एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यानंतर तो मी नव्हेच असा पवित्रा घेत लग्नास नकार देण्यात आला. १० डिसेंबर २०२१ ते ६ मार्च २०२४ या कालावधीत ती छळमालिका चालली. याप्रकरणी, पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ६ मार्च रोजी आरोपी प्रज्वल बापूराव पाखरे (२६, रा. चौसाळा, ता. अंजनगाव सुर्जी) याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला. त्यानंतर आरोपीचे आई -वडील व नातेवाईक हे फिर्यादी मुलीकडे लग्नाची मागणी घालायला गेले. सोयरिक पक्की होऊन दोघांचे लग्न ठरले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइल संवाद सुरू झाला. सोशल मीडियावरदेखील ते बोलू लागले. आरोपी हा नेहमी शारीरिक संबंधांची मागणी करत होता. मात्र, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. फोनवर बोलत असतानादेखील तो त्याच विषयाने बोलत राहायचा. आता आपले लग्न ठरले आहे. त्यानंतरच ती बाब योग्य ठरेल, असे तरुणीने त्याला बजावले.

रूम बुक करून अतिप्रसंग

तरुणीचे काहीएक ऐकून न घेता आरोपी प्रज्वलने अमरावती शहरातील फ्रेजरपुरा हद्दीतील एका ठिकाणी रूम बुक करून फिर्यादीसोबत बरेचदा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. तरुणीने कुठेही तक्रार वा घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणी व तिच्या आईला धमकावून खोटा आपसी समझोता लेखी लिहून घेतला. मात्र, त्यानंतरही त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने ६ मार्च रोजी पोलिस ठाणे गाठले. 

टॅग्स :Amravatiअमरावतीsexual harassmentलैंगिक छळ