शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

कविताच्या चिठ्ठीने केले कीर्तिराजचे अत्याचार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:18 IST

चारित्र्यावर संशय घेऊन नवरा मानसिक व शारीरिक त्रास देत अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मृत कविता इंगोलेच्या चिठ्ठीने उघड केला.

ठळक मुद्देएसपींना निवेदन : नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविली चिठ्ठी

लोकमत आॅनलाईनअमरावती : चारित्र्यावर संशय घेऊन नवरा मानसिक व शारीरिक त्रास देत अत्याचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मृत कविता इंगोलेच्या चिठ्ठीने उघड केला. कविताच्या स्वहस्ताक्षराची घरात आढळलेली चिठ्ठी तिचा भाऊ गजानन कटकतलवारे याने पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी ती चिठ्ठी नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सांगितले असून, नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. कविताच्या या चिठ्ठीमुळे तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे कथन केले आहे.कविता कटकतलवारे (इंगोले) हिचा ८ नोव्हेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर ते चांदूररेल्वे रोडवर मृतदेह आढळून आला होता. कविताच्या हत्याप्रकरणात नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी तिचा पती कीर्तिराज इंगोलेला अटक केली. त्यानेही हत्येची कबुली दिली. याप्रकरणाचा तपास अत्यंत गोपनिय पद्धतीने सुरु असल्यामुळे नातेवाइकांना माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते. या प्रकरणाचा तपास योग्य व पारदर्शक व्हावा आणि पोलिसांनी तपासाची माहिती द्यावी, अशी मागणी नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती. दरम्यानच्या काळ्यात कविताच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठी भाऊ गजाननला घरातच आढळून आली. ती पतीच्या अत्याचाराचे कथन करीत होती. चिठ्ठीनुसार, माझा नवरा, मला मानसिक व शारीरिक त्रास देतो, एकदा पतीने रात्रभर मला मारझोड करून आईच्या घरी नेऊन दिले. मुलगी चारित्र्यहीन असल्याचे सांगून वडिलांचा अपमान केला. मोबाइल हिसकावून घेतला. गाडीची चावी ठेवून घेतली. नेहमीच जिवे मारण्याची धमकी मिळायची एके दिवशी मुलांसमोरच गळ्या दाबला. गाडीवरून पडल्यामुळे मानेच्या मणक्यात गॅप आल्याने माझ्याकडून जास्त कामे होत नाही. मानसीक ताणामुळे अ‍ॅसीडीटीच्या त्रास होत होता. मात्र, मला रात्रभर निट झोपू देत नाही. त्यामुळे माझा आजार वाढतच होता. सासू काम करायला लागली की, मला झोपेतून उठून कामे करण्यास भाग पाडायचे. कोणाशीही बोलण्याची परवानगी नव्हतीच. बॅकेचे पासबूक व एफडी कार्ड हिसकावून घेतले, माझे शैक्षणिक दस्ताऐवज माहेरवरून जबरदस्तीने हिसकावून घरात ठेवले. ती चिठ्ठी तिच्या भावाच्या हाती लागल्यामुळे कवितावरील अन्यायाला वाचा फुटली आहे.मृताच्या भावाने चिठ्ठी आमच्या स्वाधीन केली आहे. ती चिठ्ठी कवितानेच लिहिली किंवा अन्य कोणी, यासाठी ती चिठ्ठी नागपूर येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.- मगन मेहते,पोलीस निरीक्षक,नांदगाव खंडेश्वर ठाणे.