शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रूग्णालयांमध्ये आढळल्या कालबाह्य लसी

By admin | Updated: June 28, 2014 23:18 IST

तालुक्यातील कोकर्डा, कापूसतळणी व सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तथा अंजनगाव ग्रामीण रूग्णालयातील शासकीय लसींचा साठा तपासणीअंती नीट असून खासगी रुग्णालयात सापडलेल्या लसी मुदतबाह्य आहेत

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कोकर्डा, कापूसतळणी व सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तथा अंजनगाव ग्रामीण रूग्णालयातील शासकीय लसींचा साठा तपासणीअंती नीट असून खासगी रुग्णालयात सापडलेल्या लसी मुदतबाह्य आहेत व लसवाहक पेटी शासकीय कार्यालयात जमा करण्यात आली आहे, असा अहवाल तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे लसींचा गोरखधंदा चालू असल्याच्या अफवेला काहीही तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शासकीय लसींना पाय फुटल्याने व या लसी कर्मचारी बाहेर पुरवीत असल्याचे तक्रारीवरुन तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १० जून रोजी शहरातील बालरोग तज्ज्ञ पवार, जलील व सारडा या डॉक्टरांकडे अचानक तपासणी केली. या तपासणीत सारडा यांच्या रुग्णालयात एक शासकीय लसवाहक पेटी व त्यात दोन-चार मुदतबाह्य टी.टी., डी.पी.टी. लसी आढळल्या. याबाबत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, सर्वसामान्य रुग्णांच्या सोयीसाठी शासनाने सारडा हॉस्पिटल मानांकित केले आहे. यामुळे येथे औषधोपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भपात व अतिदक्षता विभागाच्या सेवा घेण्यास व शासकीय सवलती घेण्यास रुग्णांची आणि शासकीय कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच अनवधानाने रुग्णालयात विसरली गेलेली लस वाहक पेटी तपासणी पथकाला आढळली. पण रुग्णालयातर्फे ती शासनजमा करण्यात आली.ज्यावेळी शासकीय तपासणी पथकाने रुग्णालयाची तपासणी केली. त्यावेळी सारडा मागील सात दिवसांपासून गावात नव्हते. आल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही विविध रोगांच्या दर्जेदार लसी लहान मुलांना पुरवितो व आमच्या रुग्णालयाच्या फ्रिजमध्ये कोणतीच शासकीय लस उपलब्ध नाही. सापडलेल्या मुदतबाह्य लसी शासकीय लसवाहक पेटीत होत्या व ज्यांची किंमत ३० रूपये आहे. रुग्णालयात भेटी देणाऱ्या शासकीय आरोग्य सेविकांकडून अशी पेटी राहून गेल्यामुळे आम्ही ती शासनाकडे जमा केली. आमच्याकडील लसींची बिलेसुद्धा तपासणी पथकास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये कुठलेही गौडबंगाल नसल्याचे स्पष्ट होते. (तालुका प्रतिनिधी)