शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावतलाव कॅनलच्या वेस्ट वेअरने भरण्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:02 IST

शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करून अचलपूर तालुक्यातील ३०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी कॅनलचे वाया जाणारे पाणी तलावात सोडण्याचा अभिनव प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयोग आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने होणार आहे.

ठळक मुद्देबच्चू कडूंचे प्रयत्न : तीनशे हेक्टर शेतजमीन ओलिताखाली घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर मात करून अचलपूर तालुक्यातील ३०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी कॅनलचे वाया जाणारे पाणी तलावात सोडण्याचा अभिनव प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयोग आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने होणार आहे. त्यांनी शनिवारी पहाटे ५.३० पासून परिसरातील गावांचा दौरा केला.अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, चमक, सुरवाडा, खोजनपूर आदी गावांचा दौरा आ. बच्चू कडू यांनी शनिवारी केला. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. लघुपाटबंधारे उपविभागीय अभियंता एस.पी. कुलकर्णी, चंद्रभागा प्रकल्पाचे रूपेश मोहिते, एन.डी. वानखडे, ओंकार पाटील, प्रहारचे अंकुश जवंजाळ, दीपक धुळधर, मंगेश हूड, संजय तट्टे, उपसभापती सोनाली तट्टे आदी उपस्थित होते.कॅनलचे पाणी तलावात सोडणारचंद्रभागा प्रकल्पावरील कॅनलमधील पाणी वाया न जाऊ देता, ते या गावातील तलावात सोडण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. पावसाळा संपताच कोरड्या पडणाऱ्या तलावांना या प्रयोगाने पुनर्जीवन मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने उपस्थित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून योग्य पर्याय काढण्याच्या सूचना आ. बच्चू कडू यांनी दिल्या. तलावातील पाण्यातून गावातील पिण्याच्या पाण्यासह परिसरातील विहिरी, बोअरवेलची पातळी वाढण्याचा प्रयोग यातून केला जाणार आहे.