शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया प्रकल्पाविना ‘प्लास्टिक’चा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:19 IST

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत असताना प्रतिबंधित प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला मर्यादा आल्याने शहरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन घनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिक असून, पालिकेला आहे त्या प्रकल्पाला अधिक क्षमतेने चालविण्याची निकड आहे.

ठळक मुद्देघनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिकच : शासन निर्देशाची अंमलबजावणी केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत असताना प्रतिबंधित प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला मर्यादा आल्याने शहरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन घनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिक असून, पालिकेला आहे त्या प्रकल्पाला अधिक क्षमतेने चालविण्याची निकड आहे.राज्यात २३ जूनपासून संपूर्ण प्लास्टिकबंदी लागू झाली. त्यानंतर प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यासह विक्रेत्यांवरही बडगा उगारण्यात आला. त्यामुळे अनेकांनी कारवाई नको म्हणून घरातील प्लास्टिक उघड्यावर फेकले. याखेरीज थर्माकॉल व डिस्पोजल वस्तूही कचºयात फेकण्यात आल्या. परिणामी रस्त्याच्या कडेला प्लास्टिकचा खच दिसून येत आहे. सुकळी येथील प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट बंद असल्यातच जमा असल्याने शहरातून निघणारे प्लास्टिक ‘जैसे थे’ सुकळी कंपोस्ट डेपोत रिचविले जाते.प्लास्टिक कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला असला तरी काही व्यापारी व दुकानदार चोरून प्लास्टिक व थर्माकॉलचा वापर करीत आहेत, तर बहुतांश जण निर्जन स्थळी प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल आणून टाकत असल्याचे वास्तवही यानिमित्ताने समोर आले आहे.राज्य सरकारचे शपथपत्रउच्च न्यायालयाने सर्व महापालिका आणि नगर परिषदांना प्लास्टिक जमा करण्यासाठी, त्याची वाहतूक करून प्रक्रियेच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. त्याबाबत निर्देश नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे.प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटला मर्यादा२ आॅक्टोबर २०१६ रोजी सुकळी कंपोस्ट डेपोत प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट कार्यान्वित करण्यात आले. मात्र, दीड वर्षानंतरही या प्रकल्पाची वेगवान अंमलबजावणी झालेली नाही. दोन दिवस सुरू आणि चार दिवस बंद अशी या प्रकल्पाची अवस्था आहे.प्लास्टिक कचऱ्यात मोठी वाढ झाल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या तुलनेत महापालिकेजवळची साधनसामग्री अल्प आहे.- नरेंद्र वानखडेउपायुक्त (सामान्य)