शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अल्प मनुष्यबळावर कसरत; प्रभारींवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:52 IST

नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना अल्प मनुष्यबळावर प्रशासन चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत व आस्थापना खर्चातील भरमसाठ वाढ यामुळे नोकरभरतीवर गदा आली. परिणामी ८० टक्के विभागप्रमुख हे प्रभारी आहेत.

ठळक मुद्देनव्या आयुक्तांसमोर भले मोठे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनियुक्त महापालिका आयुक्त संजय निपाणे यांना अल्प मनुष्यबळावर प्रशासन चालविण्याची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेचे उत्पन्नाचे मर्यादित स्रोत व आस्थापना खर्चातील भरमसाठ वाढ यामुळे नोकरभरतीवर गदा आली. परिणामी ८० टक्के विभागप्रमुख हे प्रभारी आहेत. काही वर्षांपासून उपायुक्त ते सहायक आयुक्त, अधीक्षकांपर्यंत तात्पुरता पदभार देऊन महापालिकेचा गाडा कसाबसा ओढला जात आहे.उपायुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, करसंकलन मूल्यनिर्धारक अधिकारी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख ही पदे रिक्त असल्याने त्यावर महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली. दीड वर्षांपासून महापालिकेचा आकृतिबंध मंत्रालयात धूळखात पडला आहे. मागे इमर्जंसी पदे ठेवून वाढीव पदांसाठी नव्याने प्रस्ताव देण्याचे नगरविकासने सांगितले होते. मात्र, वाढीव पदांचा तो प्रस्तावही अद्याप मंत्रालयात पोहोचला नाही. जुन्याच आकृतिबंधानुसार महापालिकेचा कारभार सुरू असून, वाढीव पदांसह आकृतिबंध मंजूर करून घेण्याचे आव्हान निपाणे यांच्यासमोर दत्त म्हणून उभे आहे.हे आहेत प्रभारीपर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांच्याकडे उपायुक्त (प्रशासन), महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांच्याकडे उपायुक्त (सामान्य) तसेच सिस्टीम मॅनेजर डेंगरे, सांख्यिकी अधिकारी योगेश पिठे तथा वरिष्ठ लिपिक सुनील पकडे व मंगेश वाटाणे यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा प्रभार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून वैद्यकीय अधिकारी, तर सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी पदावर डॉक्टर इन्चार्ज पदभार सांभाळत आहेत. शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ या तीनही पदांचा संयुक्त कार्यभार निवृत्त अनंत पोतदार यांच्याकडे आहे. या प्रभारी व्यक्तींवर निपाणेंना महापालिकेचा गाडा उत्तमरीत्या सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे.