कालपर्यंत मतदारसंघात जनसंपर्क कायम ठेवून असलेले अनंत साबळे हे तालुक्यातील दहिगाव सेवा सहकारी सोसायटीमधून प्रतिनिधी आहेत. या सोसायटी मतदारसंघातील एकूण ५६ मतदारांना ते वारंवार भेटले. त्यांचा आशीर्वाद मागितला, पण अर्ज मागे घेण्याच्या दिवशी माघार घेत त्यांनी सर्वांना धक्का दिला. त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी मोठे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. संपूर्ण सहकार क्षेत्रात गाजणारी ईडी आणि आवाजाची सीडी यामध्ये गुरफटत जाण्यापेक्षा अलिप्त राहणे कधीही चांगले, असाही सोयीस्कर विचार त्यांनी केला असेल, पण या माघारीचे परिणाम त्यांचे गटाला दीर्घकाळ भोगावे लागतील. कारण राजकारणात असलेला त्यांचा प्रभाव भावाचेही भले करेल, हे निश्चित नाही. त्यांची माघार तूर्तास तालुक्याची ब्रेकिंग न्यूज ठरली आहे.
जिल्हा बँक उपाध्यक्ष अनंत साबळेच्या माघारीने सहकार क्षेत्रात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:15 IST