शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

श्रीनिवास घाडगेंची बदली, नव्या तपास अधिकाऱ्याकडून अपेक्षा

By admin | Updated: October 3, 2016 00:08 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्याच्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता,

दिलासा : नव्या अधिकाऱ्याची कार्यप्रणाली ठरवेल पोलिसांची छबीअमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्याच्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे होता, त्या तपास अधिकारी श्रीनिवास घाडगे यांची अवघ्या चार महिन्यांतच अखेर बदली झाली. घाडगे यांच्याजागी येणाऱ्या नव्या तपास अधिकाऱ्याकडून नरबळी प्रकरणाची पाळेमुळे खणली जावी, यासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नरबळी प्रकरण संवेदनशील असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी या प्रकरणाचा तपास मुद्दामच प्रथम वर्ग अधिकारी श्रीनिवास घाडगे यांना दिला होता. घाडगे यांच्याकडे तपासाची सूत्रे येण्यापूर्वी ती मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार शैलेश शेळके यांच्याकडे होती. शेळके यांच्यावर बरेच आरोप झाल्यामुळे त्यांच्याकडील तपास काढण्यात आला होता. घाडगे यांनी या प्रकरणात सुमारे दोन महिने तपासकार्य केले. तपास करण्यालायकच्या मुद्यांचा ढीग घाडगेंपुढे होता; तथापि त्यांनी तपासादरम्यान बाळगलेली अनावश्यक गोपनीयता त्यांच्यावर संशय निर्माण करणारी ठरली. सामान्यांनी प्रथमेश आणि अजयच्या न्यायासाठी रान उठविले. परंतु तपासाबाबतची समाधानकारक माहिती घाडगे यांनी सामान्यांना कधीच दिली नाही. एका अल्पवयीनासह अटक करण्यात आलेल्या चार आरोपींशिवाय त्यांनी कुणालाही अटक केली नाही. आश्रमाचे ट्रस्टी शिरीष चौधरी, संस्थापक अध्यक्ष शंकर महाराज यांना अटक करण्याची मागणी जिल्हाभरातून ताकदीने करण्यात आली, मात्र व्यर्थ! प्रथमेश सगणे याच्या कक्षात चोरून प्रवेश केल्याच्या कारणावरून शिरीष चौधरी आणि काही ट्रस्टींविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे प्रथमेशच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती. त्याचीही घाडगे यांनी वेळीच दखल घेतली नसल्याचा आरोप होता. श्रीनिवास घाडगे यांच्याकडून तपास काढण्यात यावा, अशी मागणी त्यानंतर सामाजिक संघटनांनी लावून धरली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या मागणीसाठी नारेबाजीही करण्यात आली होती. घाडगे यांची बदली झाल्यामुळे आता तपास त्यांच्याकडून निघाला खरा; परंतु येणारा अधिकारी नरबळी प्रकरणाचा तपास किती संंवेदनशीलपणे करेल, यावर त्यांच्याविषयीची प्रतिमा निर्माण होणार आहे. पोलिसांची छबी निर्माण करणे किंवा मलिन करणे हे तपास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवरून ठरावे, इतके याप्रकरणी सामान्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ज्या आश्रमात नरबळीची प्रकरणे घडलीत त्या आश्रमातील पदाधिकाऱ्यांचा कसून तपास करावा, पालकत्त्वाची भूमिका स्वीकारलेल्या आश्रम ट्रस्ट पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, प्रथमेश सगणेच्या खोलीत चोरून प्रवेश करणाऱ्या आणि त्या कारणासाठी ज्यांची तक्रार करण्यात आली त्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवावे, मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने नावे घेतलेल्या आश्रमातील पदाधिकाऱ्यांवरही नरबळीचे गुन्हे नोंदविण्यात यावेत, आश्रमात घडलेल्या संशयास्पद मृत्युंच्या मालिकेचा तपास बारकाईने करावा, यापूर्वीच्या अपमृत्युचे रीतसर शवविच्छेदन होऊ न देणाऱ्या आश्रमातील जबाबदार लोकांना अटक ेरावी, आश्रम ट्रस्टचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमावा, शंकर महाराजांच्या आजतागायतच्या आक्षेपार्ह बाबींविषयी ज्या कुणाला माहिती आहे, त्यांची मदत तपासकामी घ्यावी आदी मागण्या याप्रकरणाशी जुळलेल्या लोकांच्या आहेत.