शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात परीक्षांचे नियोजन ढासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:32 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देतीन शाखेचे पेपर एकाच दिवशी : दोनशे आसनी केंदावर पाचशे विद्यार्थी!

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आॅनलाईन, आॅफलाईन अशा दोन्ही परीक्षेचा बोजवारा उडाला आहे.२५ एप्रिलपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे पेपर सुरू झाले. मात्र, पहिल्याच दिवशी आॅनलाईन पेपर केंद्रावर तासभर उशिरा मिळाले. दुसऱ्या दिवशी आॅनलाईनऐवजी आॅफलाईन पेपर वितरित करण्याचा प्रसंग ओढवला आहे.शनिवारी वाणिज्य शाखेचा पेपर तब्बल तासभर उशिरा सुरू झाल्याचा प्रकार स्थानिक विद्याभारती महाविद्यालय, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत निदर्शनास आला. बी.कॉम.प्रथम वर्षाच्या दुसºया सेमिस्टरचा इंग्रजीचा बॅकलॉगचा पेपर होता. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांचे आसन क्रमांकात गोंधळ असल्याने परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.परीक्षेत आसन व्यवस्था ढासळल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याची ओरड आहे. आॅनलाईन आणि आॅफलाईनद्वारा परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाचे आहे. मात्र, उन्हाळी परीक्षा सुरू होताच विद्यापीठ प्रशासन परीक्षेच्या नियोजनात नापास झाल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा