शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी, फार्मसी, विधी सेमिस्टर निकालास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 18:50 IST

हिवाळी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे हिवाळी-२०१८ परीक्षेच्या अभियांत्रिकी, फार्मसी व विधी सेमिस्टरचे निकाल जाहीर होण्यास विलंब लागत आहे. उन्हाळी-२०१९ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असताना विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आहे.यंदा परीक्षा विभागाचा कारभार सुरळीत होण्यास बराच अवकाश लागला आहे. ऑनलाइन परीक्षांचे कामकाज माइंड लॉजिक एजन्सीकडून काढून घेतल्यानंतर नव्या एजन्सीकडे जबाबदारी सोपविली. मध्यंतरी बी.ए. भाग-१ च्या ४० हजार विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका काही तांत्रिक कारणांमुळे मिळाली नव्हती. सध्या अभियांत्रिकीच्या सेमिस्टर पॅटर्नचे निकाल जाहीर होण्यास विलंब लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सेमिस्टर १ व ६ चे निकाल जाहीर झाले नाहीत. फार्मसी व विधी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर-१ चे निकाल याच आठवड्यात जाहीर करण्याची तयारी परीक्षा विभागाने चालविली आहे. हिवाळी परीक्षांचे निकाल हाती आले नसताना उन्हाळी परीक्षा येऊन ठेपल्याने विद्यार्थी हैराण आहेत. बी.फार्म. गृहपरीक्षेचा निकालदेखील लागला नाही.

डेटा ट्रान्सफरचे काम अंतिम टप्प्यातऑनलाइन परीक्षेशी निगडित सर्व जबाबदारी माइंड लॉजिक एजन्सीकडून काढून घेण्याचा निर्णय सिनेट सदस्यांनी घेतला होता. आता लर्निंग स्पायरल या एजन्सीकडे ती सोपविली आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षा व निकालाशी संबंधित डेटा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया लांबलचक असल्याने हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर होण्यास विलंब होत  आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी परीक्षेचे निकाल वेळेत लागतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

तांत्रिक कारणाने निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. विद्यार्थ्यांच्या डेटा ट्रान्सफरची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळी परीक्षा आणि निकालाचे नियोजन वेळेतच केले जात आहे. - हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग 

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा