शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

प्रवेशासाठी अचूक माहिती नोंदणीचे आदेश

By admin | Updated: April 18, 2016 00:08 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याच्यादृष्टीने शाळांच्या आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे

आरटीई प्रवेश : शिक्षण विभागाच्या शाळांना सूचनाअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील पाल्यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याच्यादृष्टीने शाळांच्या आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र ही माहिती सादर करताना शाळांनी अचूक माहिती भरण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात यंदा पहिल्यांदा आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने ११ एप्रिलपासून जिल्हा भरात आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शैक्षणिक सत्र २०१६-१७ साठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांनी शाळेची नोंदणी करताना शाळेत कोणत्या वर्षांपासून कोणत्या वर्गापर्यंत आहेत, शाळा स्थापनेचे वर्षे आदी माहिती शाळांना अचूक व काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. याशिवाय वर्गाची प्रवेश क्षमता भरताना ४० पेक्षा कमी पट दर्शवू नये. तसेच विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायितच्या शाळा, सर्व माध्यम , आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी शाळा नोंदणी केल्यानंतर केंद्रप्रमुखांकडून पडताळी करणे अनिवार्य केले आहे. याबाबत शाळांना काही अडचणी निर्माण झाल्यास पंचायत समिती स्तरावर गट शिक्षणाधिकारी आणि महापालिका स्तरावर शिक्षणाधिकारी यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी केले आहे. जिल्ह्यात सध्या शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या २१ एप्रिल पर्यत शाळांना आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकार केले आहे. ही प्रक्रिया आटोपताच आरटीईनुसार विद्यार्थ्यांच्या २५ टक्के प्रवेशासाठी आॅनालईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांची आॅनलाईन नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये शाळांनी काळजीपूर्वक माहिती सादर करणे अपेक्षित आहे. यात कुठल्याही उणिवा राहू नये याची खबरदारी बाळगण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत दिल्या आहेत. ज्या शाळानोंदणी करणार नाहीत अशा शाळांवर नियामनुसार कारवाई केली जाईल. - एस.एम पानझाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी