शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील वैभवशाली इतिहासाची साक्ष तळेगाव दशासरच्या पायऱ्यांच्या विहिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:33 IST

Amravati News धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे इतिहासकालीन गाव. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.

नीलेश रामगावकर    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे इतिहासकालीन गाव. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आजही परिसरात आढळतात. याशिवाय पायऱ्यांच्या विहिरी तर शिल्पकलेच्या उत्कृष्ट नमुना ठरल्या आहेत. मारुती मंदिरातील पायऱ्यांची ही विहीर प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत पोहचण्यासाठी चारही बाजूने काम केलेल्या काळ्या पाषाणाने पायऱ्यांचे बांधकाम  केलेले आहे.

या विहिरीच्या आत एक शिवालय व दगडी खांब आहेत. यावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे.  एकाच वेळी अनेक लोकांना पाणी भरता यावे म्हणून पायऱ्यांचे भक्कम बांधकाम करण्यात आले असावे. विहिरीतील पाणी नेहमी स्वच्छ राहावे म्हणून त्यामध्ये मंदिराचे बांधकाम करून अध्यात्माची जोड देण्यात आलेली दिसते. आजही दोन्ही विहिरींना मुबलक पाणी आहे. तळेगाव येथील इतिहास संशोधक दिवंगत बाळकृष्ण घाटे यांचे अभ्यासानुसार, या विहिरी १३ व्या शतकातील अर्थात यादवकालीन आहेत. पुष्पासारख्या रचनेमुळे या विहिरींना पुष्करणा संबोधले जात होते. आजही मारुती मंदिर व शहीद दीपक ठाकरे चौक येथील विहिरी गावाचा ऐतिहासिक वारसा जपून आहेत.

ऐतिहासिक स्थळविहिरी पाहण्यासाठी आजही अनेक लोक तळेगावात येतात. या ऐतिहासिक वारशाचे जतन झाल्यास येथील पर्यटन व्यवसायास चालना मिळू शकते. पुरातत्त्व विभागाकडून संवर्धन व संशोधन झाल्यास तळेगाव दशासर हे पौराणिक  व ऐतिहासिक स्थळ म्हणून उदयमान होण्यास मदतच मिळेल. 

टॅग्स :historyइतिहास