शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने एकास व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी

By admin | Updated: March 21, 2017 00:20 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कांमुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महिलांना संधी मिळाली आहे.

सत्यपाल महाराज : पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनअमरावती : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कांमुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महिलांना संधी मिळाली आहे. व्यसनमुक्तीसाठी महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या महापुरूषांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे एक छोटे काम मला सोपविण्यात आले आहे. हे काम संपूर्ण समाजाचे असून त्यासाठी प्रत्येकाने एका तरी व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी, असे प्रतिपादन देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी केले.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उद्योग, खनिकर्म व सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे उपस्थित होते. कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, समाजकल्याण विभागाचे आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, उपायुक्त भीमराव खंडाते, प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते उपस्थित होते. यावेळी सत्यपाल महाराजांनी विनोदाच्या माध्यमातून व्यसन करणाऱ्यांंच्या डोळ्यात खणखणीत अंजन घातले. त्यांनी अनेक उदाहरणांच्या माध्यमांतून लोक व्यसनाच्या आहारी कसे जातात, हे पटवून दिले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मार्गदर्शन करताना व्यसनाधिनतेवर प्रकाश टाकला. व्यसनाधिनता ही समाजाची मोठी समस्या असून दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यातही व्यसनाधिनता आढळून येते, याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, मुक्ता पुणतांबेकर, निशिगंधा वाड यांनी व्यसनाधीन समाजनिर्मितीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.व्यसनमुक्ती साहित्य ठेवलेल्या ग्रंथदालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सर्व उपस्थितांना दिली. प्रास्तविक पीयूष सिंह यांनी, तर संचालन रेणुका देशकर व आभार भालचंद्र मळे यांनी मानले. यावेळी राज्यातील अनेक व्यक्तींना व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. त्यामध्ये अमरावती येथील नीळकंठ बोरोळे व अचलपूर येथील अमोल चित्रकार यांचा समावेश आहे.