तिवसा : दररोज दोन तास विलंबाने येणाऱ्या बसला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी ही बस दोन तास रोखून धरली. ही घटना सोमवारी तालुक्यात वाठोडा (खुर्द) येथे घडली. बसला दररोज उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांत पोहोचण्यास विलंब होत होता. शैक्षणिक नुकसानीबाबत वारंवार निवेदने देऊन एसटी महामंडळाला कळविण्यात आले. परंतु बसफेरी सुरळीत झाली नाही. शेवटी संताप अनावर झाला आणि सोमवारी संतप्त विद्यार्थी व पालकांनी गावात आलेली ही बस दोन तास रोखून धरली. सकाळी ७ वाजता येणारी ही बस दररोज २ तास उशिरा येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले.
दररोज उशिरा येणारी बस विद्यार्थ्यांनी दोन तास रोखली
By admin | Updated: September 29, 2014 22:52 IST