शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

व्हिसीला आता दर सोमवारी डीएचओ, सीएसची हजेरी

By admin | Updated: March 7, 2017 00:22 IST

दर सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध मुद्यांवर दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य ...

अप्पर सचिवांची सूचना : जिल्हाधिकारी, सीईओंनी बैठकी असल्यास द्यावी मुभा अमरावती : दर सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध मुद्यांवर दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात येते. मात्र या व्हिसीला बरेचदा जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) आणि जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) विविध जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे आयोजित बैठकीला जात असल्याने गैरहजर राहतात. त्यामुळे आरोग्याच्या महत्वाच्या विषयावर चर्चा व आढावा योग्यरीत्या घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे सोमवारी आरोग्य विभागाच्या व्हि.सी.च्या वेळेत डिएचओ आणि सीएस या अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थितीतून मुभा द्यावी अशा सुचना आरोग्य विभागाच्या अपर सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेला लेखी स्वरूपात दिल्या आहेत.जिल्ह्याचा आरोग्यविषयक बाबींवरील आढावा दर सोमवारी दुपारी ३ ते ५.३० यावेळेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, आयुक्त आरोग्य सेवा,आणि संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्यात येतो.या आढाव्याचे वेळी आरोग्य विभागाचे सर्व कार्यक्रम प्रमुख,उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सक तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी उपस्थित असतात. या व्हि.सी.मध्ये केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा आढावा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवायच्या योजना, कार्यक्रमांची अंमलबजावणी करताना जिल्हास्तरावर येणाऱ्या तांत्रिक , प्रशासकीय तसेच वित्तीय बाबीवरील अडचणी,व उपाययोजना तसेच विहीत कालमर्यादा करावयाच्या महत्वाच्या बाबींचे नियोजन व अन्य महत्वाच्या प्रकरणी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आदी कामकाज या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होत आहे. अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक हे प्रमुख अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित नसतात. या अधिकाऱ्यांच्या अनुउपस्थितीबाबत विचारणा केली असता सदर अधिकारी जिल्हाधिकारी अथवा मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी आयोजित बैठकीसाठी गेल्याचे प्रतिनिधीकडूृन सांगण्यात येते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील सुचनांचे पालन व कामकाजात अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आरोग्यविषयक कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी दर सोमवारी दुपारी ३ ते ५.३० या वेळेत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सच्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आमंत्रित करण्यात येऊ नये, असे निर्देश आरोग्य विभागाच्या अप्पर सचिवांनी जिल्हाधिकारी व सीईओंना दिले आहेत. (प्रतिनिधी)