शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दररोज एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

By admin | Updated: March 23, 2016 00:22 IST

यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८० प्रकल्पातील ....

जिल्ह्यात ८० प्रकल्प : एका आठवड्यात १४ दलघमीने पातळीत घटगजानन मोहोड अमरावतीयंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८० प्रकल्पातील जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. एका आठवड्यात या प्रकल्पांची सरासरी पातळी १४ दलघमीने कमी झाली आहे. प्रकल्पांमधून पाण्याचा जितका वापर होतो, त्याच्या सहापटीने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. उन्हाची दाहकता अशीच राहिल्यास लवकरच जलसाठा धोक्याची पातळी गाठण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. या व्यतिरीक्त शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सापन हे चार मध्यम व ७५ मध्यम प्रकल्प आहेत. १० मार्च रोजी यासर्व ८० प्रकल्पांत ८९२.७७ इतक्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत ३०९.६० दलघमी जलसाठा उपलब्ध होता. ही टक्केवारी ३४.६८ इतकी होती. १७ मे रोजी जलसंपदा विभागाव्दारा उपलब्ध पाणीसाठ्याच्या गोषवाऱ्यानुसार या सर्व प्रकल्पांत २९३.०४ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्याची टक्केवारी ३२.८२ इतकी आहे. म्हणजेच एका आठवड्यात या सर्व प्रकल्पांचा जलसाठा १४.०३ दलघमीने कमी झाला आहे. १.८६ ने टक्केवारी कमी झाली आहे. सिंचन, औद्योगिक व पाणीपुरवठा योजनेसाठी पाण्याचा वापर दररोज एक दलघमी गृहित धरल्यास उन्हाच्या दाहकतेमुळे किमान एक दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्ह्यात ८० प्रकल्पांत जितका जलसाठा शिल्लक आहे, त्यातुलनेत ७० टक्के साठा उर्ध्व प्रकल्पात असून या प्रकल्पात दोन आठवड्यांपूर्वी १८३.२३ व मागील आठवड्यात १८०.१४ दलघमी जलसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत या आठवड्यात १७२.४९ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. एका आठवड्यात ८.६५ दलघमीने पाण्याची पातळी कमी झाली आहे. धरणात सद्यस्थितीत ३०.५८ टक्के साठा आहे. यातील गाळ व मृतसाठा १० टक्के गृहित धरल्यास प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा आहे. जलसाठ्यातील पाण्याचे नियोजन नसल्यास उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर ही धोक्याची घंटा आहे. साठवण परिसराची खोली अधिक हवीधरणाचे पाणीसाठवण क्षेत्र जितके पसरट तेवढेच बाष्पीभवन अधिक होते. त्यामुळे हे क्षेत्र अधिकाअधिक असावयास हवे. याउपरही बाष्पीभवन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सध्यातरी जलसंपदा विभागाकडे बाष्पीभवन थांबविण्यासाठी सक्षम पर्याय नसल्याचे या विभागाने सांगितले.बाष्पीभवन थांबविणे शक्य पण महागडेधरणाचे पाणीसाठवण क्षेत्र पसरट बशीच्या आकाराचे असते. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे झपाट्याने बाष्पीभवन होते. हे थांबविण्यासाठी पाण्यावर केमिकल पसरविले जाते. त्यामुळे सूर्यकिरणांचा पाण्याशी थेट संपर्क होत नाही. परंतु ही प्रक्रिया खूप महागडी आहे, असे जलसंपदाच्या अभियंत्यांनी सांगितले.