शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

अखेर दुकाने निरीक्षक दिघडेंची उचलबांगडी

By admin | Updated: June 13, 2017 00:02 IST

सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक संजय दिघडेंची अखेर उचलबांगडी झाली. त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बदली करण्यात आली आहे.

हुक्का पार्लर प्रकरण : उमरखेड येथील पदभार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक संजय दिघडेंची अखेर उचलबांगडी झाली. त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बदली करण्यात आली आहे. हुक्का पार्लर प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे. अड्डा २७ व कसबा या दोन्ही हुक्का पार्लरच्या चालकांजवळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील शॉप अ‍ॅक्टचे नोंदणी प्रमाणपत्र आढळले होते. त्यामुळे बजरंग दलाने सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या देऊन हुक्का पार्लर चालकांवर फौजदारी कारवाईची मागणी केली होती. सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत दोन्ही हुक्का पार्लरसह चार पार्लरची नोंदणी रद्द करण्यात आली होती. चुकीच्या पध्दतीने नोंदणी करून शासनाची दिशाभुल व फसवणूक करणाऱ्या हुक्का पार्लरचालकांवर फौजदारी कारवाई करावी, यासंबंधाने दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांनी कोतवाली, तर संजय दिघडेंनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, ती तक्रार अपूर्ण असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी हुक्का पार्लरच्या दस्ताऐवजांची मागणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयास पत्राद्वारे केली. मात्र, दोन्ही दुकान निरीक्षकांनी १५ दिवस आजारापणाची रजा घेतली होती. दरम्यान सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने महाआॅनलाईनकडून ते दस्तऐवज प्राप्त केले. त्यानुसार कांबळे यांनी प्राप्त केलेले दस्तऐवज कोतवाली ठाण्यात सादर करण्यात आली. मात्र, अद्याप दिघडे यांनी केलेल्या अपूर्ण तक्रारीसंबंधित दस्तऐवज गाडगेनगर पोलिसांना प्राप्त झाले नाही. याप्रकरणी दिघळे यांच्या कामकाजाची चाचपणी करून सहायक कामगार आयुक्तांनी प्रशासकीय कारवाई करीत त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती सूत्रानी दिली.