फोटो पी १० लेखापाल
परतवाडा:- मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत विभागीय कार्यालयात कार्यरत लेखापालाची मागील ४२ दिवसांपासून सुरू असलेली कोरोनाशी झुंज अखेर ८ जून रोजी संपुष्टात आली. उपचारादरम्यान त्यांची नागपूर येथे प्राणज्योत मालवली. वनमजूर ते लेखापाल पर्यंतचा प्रवास संपला. देविदास खोटे (४७, रा. परतवाडा ) असे मृत लेखापालाचे नाव आहे.
उपवनसंरक्षक गिन्नी सिंह यांनी केलेली आर्थिक भावनिक मदत मानवतेच्या दृष्टिकोनातून शब्दांपलीकडची राहिली. चौफेर मदतीचा ओघ सुरू झाला. अगदी वन्यजीव विभागाकडूनही आर्थिक मदत केल्या गेली आणि अल्पावधीतच जवळपास सहा लाख रुपयांची मदत खोटे यांचे कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. दरम्यान, खोटे यांच्यावर नागपूर येथे औषधोपचार सुरू असतानाच ४२ व्या दिवशी नियतीने डाव साधला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.