शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पन्नाशी उलटली तरी मेळघाटात बदली; अग्निपरीक्षा घेताय का?

By जितेंद्र दखने | Updated: May 8, 2023 21:27 IST

सहाव्या टप्पा : प्रशासनाकडे मांडली बाजू

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात मेळघाटात रवानगी केलेले ३०६ शिक्षक सध्या विविध कारणांमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या शिक्षकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी व गाऱ्हाणी मांडली आहेत. यावर प्रशासन आमची बाजू ऐकून घेत नसल्याची ओरड या शिक्षकांची आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपली असली तरी या प्रक्रियेत ३०६ शिक्षकांची मेळघाटमध्ये बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामधील बहुतांश शिक्षक हे ५२ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. यातील अनेकांनी यापूर्वी मेळघाटात सेवा दिलेली आहे. बदली प्रक्रियेचा सहावा टप्पा हा चुकीच्या पद्धतीने राबविला गेला. या बदलीबाबत कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ३०६ शिक्षकांची मेळघाटात बदली करण्यात आली. मात्र, आता आमची बाजू कुणीही समजून घेत नसल्याची ओरड या शिक्षकांची आहे. याशिवाय सुनावणीही घेतली जात नसल्याचे म्हणणे आहे. दरम्यान, शिक्षक विभागाकडे या बदल्यांसंदर्भात शिक्षकांनी आतापर्यंत २००च्या वर आपल्यावरील अन्याय दूर करण्याबाबत लेखी आक्षेप व तक्रारी तक्रार निवारण कक्षाकडे सादर केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने निराकरण करण्यासाठी आता शिक्षण विभागाचे अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आमची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी देवेंद्र खैर, पंडित भोयर, देवेंद्र ढोक, सुजाता गजभिये, राजेश गजभिये व अन्य अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली आहे.तर सपाटीवरील शाळेत शिक्षक राहणार नाहीत

गैरआदिवासी भागातील म्हणजेच सपाटीवरील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३०६ शिक्षकांना मेळघाटमध्ये बदलीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सपाटीवरील शाळांमध्ये शिक्षकांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती