शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१४ ग्रामपंचायतीचे ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापन, सीईओंच्या अध्यक्षतेखाली समिती

By जितेंद्र दखने | Updated: July 20, 2023 19:08 IST

अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या ...

अमरावती : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे तालुकास्तरावर बाजी मारलेल्या १४ गावांचे जिल्हास्तरीय समितीमार्फत ‘सुंदर गाव’ अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया १७ जुलैपासून सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या नेतृत्वात सात सदस्यीय समिती गावांची प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करीत आहे."राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेत जिल्हास्तरावर १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ‘आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव‘ योजनेंतर्गत २०२१-२२ मध्ये झालेल्या कामकाजाचे मूल्यमापन तसेच दस्तऐवजाची जिल्हास्तरीय समितीची तपासणीची मोहीम १७ ते २७ जुलैपर्यंत केली जाणार आहे. झेडपीचे सीईओ अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख, बांधकामचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे आदींचा सहभाग असलेली जिल्हास्तरीय समिती स्मार्ट ग्रामचे मूल्यमापन करीत आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने ग्रामीण भागासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत तालुकास्तरावर चौदा व जिल्हास्तरावर एका गावाची स्मार्ट ग्राम म्हणून निवड केली जाते. तालुकास्तरावर निवड झालेल्या गावांना प्रत्येकी दहा लाख, तर जिल्हास्तरावरील गावास चाळीस लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. या पारितोषिकाच्या रकमेतून गावात काय कामे करायची आहे, याच्या सूचना ग्रामविकास विभागाकडून दिल्या जातात. यंदा या योजनेत जिल्हास्तरावर १४ गावे निवडली असून जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी या गावात स्पर्धा निर्माण झाली आहे. तपासणी समितीकडून गावांतील विकासकामांची पाहणी केली जात आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावरील स्मार्ट गावाची निवड जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अशी आहेत गावेस्मार्ट ग्राम योजनेत पिंपयखुटा (ता. वरूड), लिहिदा (मोर्शी), देवरी (भातकुली), भारवाडी (तिवसा), बोरगाव धर्माळे (अमरावती), राजना (चांदूर रेल्वे), हिंगणगाव, (धामणगाव रेल्वे), पाळा (नांदगाव खंडेश्वर), नरदोडा (दर्यापूर), काळगव्हाण (अंजनगाव सुर्जी), तळवेल (चांदूर बाजार), मल्हारा (अचलपूर), झिल्पी (धारणीड), भुलोरी (चिखलदरा) या गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती