शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या दालनात गणेशमूर्तीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

अमरावती : शहरातील विविध मार्गावर पडलेले खड्डे बुजवा, शहरातील रस्त्यांची, नाल्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा या मागणीकरिता ...

अमरावती : शहरातील विविध मार्गावर पडलेले खड्डे बुजवा, शहरातील रस्त्यांची, नाल्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा या मागणीकरिता युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आगळेवेगळे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात गणपतीच्या मूर्तीची विधिवत पूजा व स्थापना करून गणरायाची आरती करण्यात आली. अधिकाऱ्यांना कामे करण्यासाठी सद्‌बुद्धी दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

आंदोलन गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आले.

यावेळी ढोल, तासे वाजत-गाजत युवासेनेचे पदाधिकारी बांधकाम विभागात शिरले. गणपती बाप्पा मोेऱ्या, ‘जय भवानी जय शिवाजी असे नारे यावेळी लावण्यात आले. कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने उपअभियंता विनोद बोरसे यांच्याशी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख राहुल माटोडे यांनी चर्चा करून तातडीने कामे करा अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा दिला त्यानंतर निवेदन देण्यात आले.

१० सप्टेंबरला गणेशउत्सव सुरु होत आहे. त्यापूर्वी शहरातील मुख्य चौकातील अर्धवट असलेले काँक्रिटीकरणाचे रस्ते, नाल्या, पूर्ण करा तसेच नव्याने सुरू असलेला जुना बायपास, एमआयडीसी मार्गाचे डांबरीकरणाचे कामाची चौकशी करून निकृष्ट दर्जाचे पेव्हींग ब्लॉक तत्काळ काढण्यात यावे, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी राहुल माटोडे, संजय शेटे, सिचन ठाकरे, चेतन वानखडे, अनिकेत ढाणके, गोलू नायले, पंकज फुके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.