शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्याच्या दालनात गणेशमूर्तीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:00 IST

शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व अपूर्ण राहिलेले कामे तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या दालनात गणपतीची मुर्ती स्थापना करून शुक्रवारी युवा सेनेने अभिनव आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत मूर्ती आणून त्याची विधिवत पूजा करून चक्क कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ते बसविल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देयुवा सेनेचे अभिनव आंदोलन : कामे अर्धवट, खड्डे बुजविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व अपूर्ण राहिलेले कामे तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे यांच्या दालनात गणपतीची मुर्ती स्थापना करून शुक्रवारी युवा सेनेने अभिनव आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी वाजतगाजत मूर्ती आणून त्याची विधिवत पूजा करून चक्क कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ते बसविल्याने एकच खळबळ उडाली.शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागात शिरले. शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत. सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते करण्यासाठी अनेक ठिकाणी चांगले रस्ते उखडून नवीन रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. नवीन कामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजनशून्य असल्याचा आरोप युवा सेनेचे माटोडे यांनी केला. गणेश चतुर्थी दोन आठवड्यावर येऊन ठेपल्याने गणपतीची नागरिकांना व गणेश मंडळांना मूर्ती नेताना शहरातील मार्गावरील खड्यांमुळे व्यत्यय येऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रस्त्यांची कामे तातडीने करण्यात यावे, अशी भूमिका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम विभागावर धडकले होते. आंदोलनाची आक्रमकता पाहता, गाडगेनगर पोलीस कार्यकारी अभियंत्याच्या दालनात दाखल झाले होते. परंतु, कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने त्यांनी येथील महिला अभियंत्यांना निवेदन सादर केले. शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व नवीन कामांमध्ये होत असलेली दिरंगाई व कंत्राटदारांचा मनमानी कारभार थांबविण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. कार्यकारी अभियंत्यांना गणपती बाप्पांनी सद्बुद्धी द्यावी, अन्यथा यानंतर शिवसेना स्टाइलने उत्तर देण्यात येणार असल्याचा इशाराही माटोडे यांनी दिला. शहरातील अमरावती बडनेरा मार्ग, सायंस्कोर मैदानावर रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने युवा सेनेचे पदाधिकारी संतापले होते.शैलेसिंग चव्हाण, सुभाष मसदकर, सतीश ठाकूर, अजय शिरसाठ, नरेश नावंदर, राजा शिरसाठ, कर्तिक गजभिये, बंडू गोकुलकर, प्रवीण वाकेकर, अमित गोटे, मिथून सोळुंके, मनोज करडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची आंदोलनात उपस्थिती होती.