शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेबांच्या गावी कृषी कंपनी स्थापन व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:11 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे (आत्मा) जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापित केल्या जात आहे. ही चांगली बाब आहे.

वीरेंद्र जगताप : खरीप पूर्व आढावा बैठकीत ‘आत्मा’ला सूचनाअमरावती : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे (आत्मा) जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कंपनी स्थापित केल्या जात आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, देशाचे पहिले कृषीमंत्री असलेले डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी अशा प्रकारची कंपनी स्थापन्याविषयी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना आ. वीरेंद्र जगताप यांनी खरीपपूर्व आढावा बैठकित केली. ‘आत्मा’ यंत्रणेचे अधिकारी कधीही लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. याविषयी आ. जगताप यांनी प्रकल्प संचालक मिसाळ यांना खडेबोल सुनावले. या यंत्रणेमध्ये समन्वय व अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ‘आत्मा’ हरविला असल्याची टिका त्यांनी केली. ‘आत्मा’मध्ये तालुका तंत्रज्ञान अधिकाऱ्यांची कंत्राटी स्वरुपातील पदे रिक्त आहेत. ते जिल्हास्तरावर भरण्याचे अधिकार असल्याने तातडीने भरण्यात यावे, अशी सूचना आ. जगताप यांनी केली.या यंत्रणेद्वारे कृषी मित्रांची बैठक होत नाही. किंबहुना या जागाच रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे स्थानिक ग्रामपंचायतीच्या मार्फत भरण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. या यंत्रणेचे प्र्रकल्प संचालक नेहमीच अनुपस्थितीत असतात. त्यामुळे त्यांचा समन्वय नाही. नियोजन नसल्यामुळेच आत्मा यंत्रणेचे प्राण हरविला असल्याची बोचरी टीका आ. जगताप यांनी केली. यावर आत्माची रिक्त पदे तातडीने भरावी व संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना कृषी संबंधी योजनाबाबत विचारात घ्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेत.