शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात यंदापासून नामांकन ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:32 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षीपासून ऑनलाइन नामांकन प्रणाली लागू करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयांकडे जबाबदारी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात यावर्षीपासून ऑनलाइन नामांकन प्रणाली लागू करण्यात येत आहे. ही सुविधा बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी राहील. महाविद्यालयांना ही प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याकरिता विद्यापीठाने सॉफ्टवेअर विकसित केले आहे.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या नेतृत्वात विद्यापीठाचा कारभार ऑनलाइन केला जात आहे. पहिल्या टप्प्यात परीक्षेशी संबंधित ‘एंड टू एंड’ कामे ही ऑनलाइन सुरू करण्यात आली आहेत. त्याकरिता विद्यापीठाने एजन्सीसुद्धा नेमली. ऑनलाइन नामांकन प्रणालीची जबाबदारी लर्निंग स्पायरल या संस्थेकडे सोपविली आहे. येत्या १५ ऑगस्टनंतर महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नामांकन प्रणाली सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नामांकन दाखल करतानाच परीक्षा अर्जदेखील भरला जाईल.ऑनलाइन नामांकन प्रक्रिया ही महाविद्यालयांना पूर्ण करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन नामांकन भरावे लागतील. महाविद्यालयनिहाय प्रचार्याकडे लॉग-इन दिले जाईल. प्राचार्यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ऑनलाइन नामांकन विद्यापीठाकडे पाठवावे लागतील. या प्रणालीतून विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयात राहील. यात जातनिहाय वर्गवारी आणि उत्पन्नाची आकडेवारी सहजतेने उपलब्ध होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.प्राचार्य, लिपिकांची होणार कार्यशाळाअमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील ३८३ महाविद्यालयांत ऑनलाइन नामांकन प्रणाली लागू केली जाणार आहे. या प्रणालीची माहिती देण्यासाठी विद्यापीठात १५ ऑगस्टपूर्वी प्राचार्य, लिपिकांची कार्यशाळा होणार आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तयारी चालविली आहे.ऑनलाइन नामांकन हे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच करावे लागणार आहे. ही जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयांवर सोपविली आहे. याप्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा फार्म भरण्याची गरज राहणार नाही. महाविद्यालयांसाठी अतिशय चांगली प्रणाली आहे.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र