शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी घेतला फराळ स्पर्धेचा आनंद

By admin | Updated: November 24, 2015 00:23 IST

महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी लोकमत सखीमंच नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते.

‘कुकरी शो’देखील रंगला : घरकूल मसाले, सखी मंचचे आयोजनअमरावती : महिलांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी व सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी लोकमत सखीमंच नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करीत असते. याचाच एक भाग म्हणून सखींसाठी दीपावली फराळ स्पर्धा व कुकरी 'शो' व फराळ स्पर्धा येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी पार पडली. सखीमंच व घरकूल मसालेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. यामध्ये सखींनी एकापेक्षा एक पदार्थ तयार करून आणले होते. या पदार्थांची सजावट कलात्मकतेने करण्यात आली. स्पर्धेत गोड पदार्थांच्या गटात आरती मकवाना यांनी तयार केलेल्या चिरवंटाला प्रथम तर द्वितीय क्रमांक सीमा गोरांडे यांनी पटकावला. खाऱ्या पदार्थांमध्ये वंदना मालपे यांनी तयार केलेल्या चकलीला प्रथम तर अर्चना एरंडे यांच्या खाऱ्या पापडीने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘कुकरी शो’मध्ये शेफ समीर दामले यांनी सखींना रेस्टॉरेंट स्टाईल भाज्या, सूप, स्नॅक्स आदींचे विविध प्रकार शिकवले. सखींनी या सर्व पदार्थांची चव घेऊन समीर दामले यांना विविध प्रश्न विचारले. त्यांच्याकडून हेल्थ टिप्सदेखील घेतल्यात. कार्यक्रमात सहभागी सखींना घरकूल मसालेतर्फे मसाल्यांची पाकिटे देण्यात आलीत. याच कार्यक्रमात युनियन एजन्सीकडून सखीमंच सदस्या नोंदणी अंतर्गत देण्यात आलेल्या मोबाईल सेटचा लकी ड्रॉ देखील दीपा अग्रवाल यांच्या हस्ते काढण्यात आला. यामध्ये ज्योती शेंदुरजने (सदस्य क्र.-०३५९५९), वर्षा राऊत (सदस्य क्र.-०३९८८०), प्रगती ढोले (०३८०७९), भाग्यश्री रेवस्कर (०४१९०३), यांनी बक्षिसे पटकावली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून शीतल मेटकर व दीपा अग्रवाल उपस्थित होत्या. संचालन आरती देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी रंजना वाघ, रोहिणी कुंटे, भारती दातेराव, विद्या सरोदे, नंदा वाघमारे, करूणा नाशिककर, माधुरी बोकरिया, अरूणा इंगोले, संगीता अजमिरे आदींनी प्रयत्न केलेत.